नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील वाळुंज गावात ज्ञानदीप विद्यालय येथे रुईछत्तीसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आज लसिकरण कँम्प व कोरोना तपासणी कँम्प आयोजित करण्यात आला होता.
या ठिकाणी लसिकरण करणार्या व्यक्तीचे कोरोना तपासणी करण्यात येत होती. नाकातील स्राव व घशातील स्राव चे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली नाकातील तपासणी रिपोर्ट पाच दहा मिनिटे मध्ये तपासणी व्यक्ती ला कळवला जात होता. आज वाळुंज गावात रिपिड ॲटिजन टेस्ट दरम्यान एकही व्यक्ती कोरोना बांधीत आढळून आला नाही हे विशेष तसेच घशातील स्रावाचा अहवाल दोन दिवसांनी तपासणी केलेल्या व्यक्तीच्या मोबाईल वर मॅसेज च्या माध्यमातून कळवला जातो. कोरो ना तपासणी झाल्यानंतर गावातील वय वर्षं 45 पुढील नागरिकांना ६० लसिचे डोस देण्यात आले.
या वेळी वाळुंज गावचे सरपंच संरपच सुखदेव दरेकर, उपसरपंच अनिल मोरे, माजी सरपंच बाळासाहेब दरेकर,विजय शेळमकर,राजु हिंगे, ग्रामसेवक बरबडे भाऊसाहेब,कामगार तलाठी पठाण, वैद्यकीय अधिकारी सौ.सविता ससाणे, परिचारिका सावंत, आशा सेविका जयश्री दरेकर, रोहिणी सपाटे, सुलोचना झरेकर, आदी ग्रामस्थांनी कँम्प यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

