सुरेगाव । काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची पायमल्ली करणाऱ्यावर स्थानिक पोलीस प्रशासनाने दंडात्मक आज रोजी कारवाई केली आहे. (रविवार दि. १६) २० जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून सहा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करावे यासाठी कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोळपेवाडी चौकीतील पोलीस नाईक भगवान ढाका व होमगार्ड यांच्याकडून कारवाई करण्यात आली. यावेळी पाेलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना मास्क वापरणे, घराबाहेर न पडणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दी न करणे, विनाकारण घराबाहेर न पडणे यासह अन्य उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन केले. शिवाय याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पाेलीस अधिकाऱ्यांनी दिला. कोपरगाव ग्रामीण पोलिसांकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न करत असून आज रोजी देखील झगडे फाटा येथे तब्बल 77 जणांवर व सुरेगाव शनी चौक हद्दीत 20 जणांवर कारवाई केली आहे.

