shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टीम कोविड केअर श्रीरामपूर च्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात खाजगी स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक..!

टीम कोविड केअर श्रीरामपूर च्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात खाजगी स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक...!

श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
कोरोना काळामध्ये टीम कोविड केअर विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय सामाजिक कार्य करत आहे. याचाच एक भाग म्हणून टीमचे सदस्य ग्रामीण रुग्णालयात गेले असता प्रभारी वैद्यकीय अधीक्षक- डॉ.योगेश बंड, डॉ.तौफिक शेख,डॉ.मुकुंद शिंदे, डॉ.शेवंते व त्यांचे अन्य सर्व सहकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्याबळामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याचे लक्षात आले. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास आले.

ही गोष्ट लक्षात घेऊन टीम कोविड केअरने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने दिनांक 1 मे 2021रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून स्वखर्चाने मानधन तत्त्वावर एका गरजू स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. सदर कर्मचारी दररोज रुग्णालयात जाऊन स्वच्छतेची कामे पार पाडत आहे.

टीमच्या या कामाबद्दल टीमचे सदस्य ऍड.समीन बागवान, कॉ. जीवन सुरुडे,शरीफ शेख, नईम शेख,अकबर पठाण, रवींद्र त्रिभुवन सर, जावेद पठाण श्रीकृष्ण बडाख, मेहबूब शेख, फय्याज इनामदार, चंदू मोरे व मुदस्सर शेख यांचे रुग्णालय व्यवस्थापनाने विशेष आभार व्यक्त केले. या अतुलनीय कार्याबद्दल सर्व स्तरातून टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या टीम पासून प्रेरणा घेऊन अनेक हात लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.
close