प्रतिनिधी : संजय वायकर :-
करमाळा (दि.१२) : जनतेच्या सेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर व मित्र परिवार यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयासाठी करमाळा तहसीलदार यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर सुपूर्त करण्यात आले.
करमाळा शहर व तालुक्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आणि ऑक्सिजन अभावी रुग्णांचे जाणारे प्राण ही खरोखरच चिंतेची बाब आहे .
याच गोष्टी लक्षात घेऊन 'तपश्री प्रतिष्ठान व गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन ' संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांचा परिवार व मित्र परिवार यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय करमाळा डॉ. कोळेकर व त्यांचा स्टाफ तसेच तहसीलदार श्री .समीरजी माने साहेब यांचेकडे तालुक्यातील रुग्णांच्या सेवेकरीता 21ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते श्री . श्रेणिक खाटेर व ऑक्सिजन सिलेंडर चे काम पाहणारे श्री . संतोष भांड यांचेकडून सुमारे दीड महिन्यापासून शहरांत व तालुक्यातील घरी असणाऱ्या 600 ते 700 कोविड पेशंट ला ऑक्सिजन सिलेंडर रात्री व दिवसा अशी पूर्ण 24 तास सेवा देण्यात आली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले.
या सामाजिक कार्याबद्दल तहसीलदार समीरजी माने साहेब तसेच डॉ. कोळेकर यांनी खाटेर मित्र परिवार व संतोष भांड यांना धन्यवाद दिले.
या ग्रुप च्या वतीने एक महिन्यापासून दररोज 100 जेवणाचे मोफत डबे पुरवण्यात आले. या पुढेही गरजुंना मोफत जेवणाचे डबे दिले जाणार आहेत त्याचा गरजु व्यक्तींनी लाभ घ्यावा असे ग्रुप च्या वतीने आवाहन करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या ऑक्सिजन सिलेंडर मुळे करमाळा तालुक्यातील जेऊर येथील आजी माजी आमदार साहेबांच्या हस्ते उदघाटन झालेले व ऑक्सिजन सिलेंडर अभावी चालू होऊ न शकलेले ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल चालू होण्याची शक्यता आहे.
या महामारीच्या काळात
समाजातील विविध संस्था आणि दानशुर व्यक्तींनी पुढे येवून कोरोना बाधित रूग्णांसाठी व गरजु व्यक्तींसाठी मदत करावी असे तहसिलदार श्री.समीरजी माने यांनी सांगितले.
यावेळी डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. तुषार गायकवाड, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष महेशजी चिवटे, पत्रकार सुहासजी घोलप, चरणसिंग परदेशी, अरुण तांगडे, दिनेश मुथा, आशिष बोरा, धिरज सोळंकी, वैभव दोशी, विश्वजित परदेशी, दिनेश ममादपुरे,सौरभ शिंगाडे, रोहित वाघमारे, संघर्ष न्यूज चे सिद्धार्थ वाघमारे, अजित सोळंकी,अॅड.साखरे,विकास लष्कर, विजय बरीदे, गिरीश शहा, यांचेसह अॅड.संकेत खाटेर व वर्धमान खाटेर उपस्थित होते.

