प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
सामान्य जनतेचा तथा श्रमिक, कष्टकरी लोकांचा प्रशासनावर विश्वास असतो व ते काम लवकर व्हावे किवा सदरील कामांची दखल घेतली जावे यासाठी निवेदन वा तक्रार दिली जाते, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या माध्यमातुन निवेदन तक्रार देऊन जर दहा दिवस कार्यवाही केली जात नसेल तर सामान्य गरीब कष्टकरी यांच्या निवेदनाचे वा तक्रारीचे काय होत असेल या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
सविस्तर बातमीपत्र असे कि केज तहसिल कार्यालया मध्ये दहा दिवसापुर्वी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ केजच्या वतीने राष्टीय महामार्गाचे निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या कामाची तपासणी, व्हावी व संबधीत एच पी एम कंपनीवर , गुत्तेदारावर, इंजीनीयवर कार्यवाही व्हावी या आशयाचे निवेदन दि १७- ०५ -२०२१ या रोजी दिले गेले होते व त्याची आवक जावक रजिस्टरला नोंद घेतली गेली परंतु महिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष अजय भांगे हे प्रदिवस तहसिल कार्यालयास विचारना करत होते.
परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे महसुल विभागाने सहकार्य केले नाही व संबधीत कंपनील / गुत्तेदाराला / इंजिनियरला पत्रव्यवहार केला नाही त्यामुळे आज दि २७ रोजी परत त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने स्मरण तक्रार निवेदन देण्यात आले व या निवेदनात महसुल प्रशासनाने पाठीमागील दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा केज तहसिल कार्यालयातील संबधीत कर्मचार्यांची त्यांच्या संशयस्पद कामाची महाराष्टू शासनाच्या " आपले सरकारवर " या पोर्टलवर तक्रार केली जाईल व आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असे सांगण्यात आले याप्रसंगी भाऊसाहेब पाचपिडे मेराज इनामदार.

