shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा उपक्रम स्तुत्य; नगराध्यक्ष अंकिता शहा.

इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा उपक्रम स्तुत्य; नगराध्यक्ष अंकिता शहा.
नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी
स्वप्नील सावंत यांचे केले कौतुक..
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरात कडक   लॉकडाऊन मुळे हॉटेल व अन्य व्यवसाय बंद असल्याने रुग्णांची व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना गेली नऊ दिवस चहा नाष्टा व पाण्याची सोय करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या ठिकाणी इंदापुर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी भेट दिली. यावेळी बोलताना अंकिता शहा म्हणाल्या की ,गेली नऊ दिवस हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे.इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत नेहमी चांगले उपक्रम राबवतात.भविष्यात हा उपक्रम त्यांनी सुरू ठेवावा असे मत अंकिता शहा यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की, इंदापूर ग्रामीण रुग्णालय व या परिसरात असणाऱ्या इतर खाजगी  रूग्णालयांत कोविड उपचारासाठी ऍडमिट रुग्णांची सर्वात जास्त संख्या आहे.
अनेक रूग्णांचे नातेवाईक आपल्या पेशंटची काळजी घेण्यासाठी  व गोळ्या औषधें देण्यासाठी येथेच असतात 
इंदापुर शहरात कडक लॉकडाउन असल्यामुळे त्या सर्वांचे घरून डबा येई पर्यंत उपासमार होत आहे. प्रदेशाध्यक्ष आ.नाना भाऊ पटोले, जिल्हाध्यक्ष आ. संजय जगताप  यांच्या आदेशाने इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने आंम्ही दररोज १५० ते २०० लोकांची नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. इंदापूर तालूका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते दररोज नागरीकांच्या सेवेत कार्यरत आहेत.
आज ९ वा दिवस होतो यापुढेही हा उपक्रम असाच चालू राहणार आहे. ह्या उपक्रमाला आज नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी भेट दिली . त्याच बरोबर मुकुंद शहा , दिलीप वाघमारे, प्रशांत शिताप , पुणे जिल्हा सरचिटणीस जकिर काझी ,इंदापूर तालुका महिला अध्यक्ष सीमा कल्याणकर , इंदापूर शहर अध्यक्ष चमन भाई बागवान , उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना सदस्य आबासाहेब निंबाळकर , तालुका सरचिटणीस निवास शेळके , खजिनदार भगवान पासगे , संजय गांधी निराधार योजना सदस्य महादेव लोंढे , तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस मिलिंद साबळे आदी उपस्थित होते
close