shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ना.छगन भुजबळ यांच्या स्थानिक विकास निधीतून येवला,नगरसुल व लासलगाव येथील कोविड रुग्णालयांना प्रत्येकी २० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा पुरवठा..!


नाशिक विभाग ।  प्रतिनिधी (संजय गांगुर्डे):-
ता.१९-५-२०२१

येवला: दि.१८ मे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी येवला मतदारसंघात येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे. 


याठिकाणी आलेल्या रुग्णांना प्राथमिक स्वरूपात ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी २० या प्रमाणे ६० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देण्यात आले आहे. 

येवला  उपजिल्हा रुग्णालयात मतदारसंघातील नाही तर परिसरातील इतर ठिकाणाहून दाखल झालेल्या अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या तीनही रुग्णालयांसाठी ६० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची व्यवस्था करून दिलेली आहे. 

या प्रसंगी सिव्हिल सर्जन श्री थोरात साहेब , Rmo श्री खैरे साहेब ,बाळासाहेब लोखंडे साहेब स्विय सहाय्यक ,डाॕ.शैलैजा कुप्पास्वामी ,डॉ.पंकज पाटील ,श्रीमती संगिता साबळे ईनचार्ज सिस्टर ,श्रीमती बागुल सिस्टर , दिपक लोणारी ,सचिन सोनवणे ,सुमित थोरात ,सुभाष गांगुर्डे , अरूण चव्हाण , डॉ शिरसाठ , आदी ऊपस्थित होते.
close