shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा तालुक्याला रिटेवाडी सिंचन योजना राबवण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केलीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी ... श्री.महेश चिवटे


 
प्रतिनिधी : सूर्यकांत होनप

करमाळा (दि.९):   कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्याचे हक्काचे साडेपाच टीएमसी पाणी रिटेवाडी येथून उचलुन विहाळ चढावरील कुकडीच्या कॅनॉलमध्ये सोडुन करमाळा तालुक्यातील ३० हजार‌ एकर क्षेत्र ओलिताखाली आणावे,   हा प्रस्ताव गेल्या पाच वर्षापासून शासनाकडे धुळ खात पडून आहे. या प्रस्तावाला शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी मा .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री .महेश चिवटे यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यासाठी कुकडी प्रकल्पातून साडेपाच टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव आहे. कुकडी प्रकल्पापासुन करमाळा तालुक्यातील शेवटच्या कॅनॉल चे अंतर २४९ कि.मी.आहे .एवढ्या दूर अंतरावरून करमाळ्याला कधीही गेल्या तीस वर्षात पाणी मिळाले नाही. या प्रकल्पातील जवळपास 500 कोटी रुपयांचे कॅनॉल करमाळा तालुक्यात खोदले आहेत . परंतु करमाळ्याला फक्त अर्धा टीएमसी पाणी कसेतरी मिळते. 

निष्कृष्ट दर्जाची झालेली कॅनॉलची कामे व यामध्ये झालेला भ्रष्टाचार, पाणी येताना होणारी फोडाफोडी यामुळे करमाळा तालुका गेल्या तीस वर्षापासून कुकडीच्या पाण्यापासून वंचित आहे.  गेल्या तीस वर्षात करमाळा तालुक्याचे जवळपास अंदाजे 150 टीएमसी पाणी पुणे, नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी हडप केले आहे. करमाळा तालुक्यातील ३०हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन वर्षानुवर्षे पाण्याच्या थेंबाथेंबासाठी आसुसलेला दुष्काळी भागातील करमाळ्यातील शेतकरी सुखी होईल. 

या योजनेसाठी केवळ दहा ते अकरा किलोमीटर पाईपलाईन व पंपहाऊस ची गरज आहे. 
या मागणीसाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली मात्र शासनाने याची दखल घेतली नाही. तरी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून लवकरात लवकर या कामाची दखल घ्यावी असे श्री .महेश चिवटे यांनी सांगितले .
close