संगमनेर - चंदनापुरी घाटामध्ये टोमॅटो घेऊन जाणारा ट्रकचे नियंत्रण सुटून चालक जागीच ठार
संगमनेर । प्रतिनिधी : ऋषिकेश जगताप.
या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. हा आयशर टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोतील टोंमॅटोचा सडा रस्त्यावर पडला होता.
टोंमॅटो घेऊन जाणारा आयशर टेम्पो पुणेहून आळे फाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाट परिसरात आला असता टेम्पो महामार्गावर पलटी झाला. टेम्पोमधील टोंमॅटोचे भरलेले क्यारेट महामार्गावर अस्ताव्यस्त होऊन टोंमॅटोचा सडा पडलेला होता. या टेम्पोखाली एक जण अडकलेला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच डोळसणे महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस अरविंद गिरी, कैलास ठोंबरे, संजय मंडलिक यांनी घटनास्थळी धाव घेतली रस्त्याची वाहतूक सुरळीत केली.

