खर्डा प्रतिनिधी
जामखेड शहरात महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातील जुने शिऊर रोड येथील घिसाडी समाज बांधवांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली
यावेळी हिंदवीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे दुधाने अभिषेक करण्यात आला व पूजन जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच कोरोना चे नियमाचे पालन करून समाज बांधवांनी अभिवादन केले.
यावेळी बोलतानापोलिस निरीक्षक गायकवाड म्हणाले महाराणा प्रताप हे महापराक्रमी योद्धा तसेच आपल्या मातृभूमी व रयतेवर प्रेम करणारे धुरंदर योद्धे व राजे होते.
समाज घडवायचा असेल तर तरुणांनी वाचन केले पाहिजे.एका पराभवाने खचून न जाता पुन्हा, उभारून यश खेचून आणले पाहिजे हीच महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिले.
याप्रसंगी कचरू साळुंखे,दिलिप पवार, धनराज पवार, प्रकाश साळुंके, दिलीप साळुंखे, नागेश पवार, मायकल साळुंखे, विकी साळुंके, आशु साळुंके, शुभम पवार, संस्कार पवार आदी समाज बांधव उपस्थित होते.

