shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खा.राजीव सातव यांना श्रद्धांजली

इंदापूरात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खा.राजीव सातव यांना श्रद्धांजली 
          इंदापूर प्रतिनिधी:   आज इंदापूर शहरात खा.राजीव सातव यांची काँग्रेस पक्षाच्या वतीने शोक सभा आयोजित केली होती. ह्यात काँग्रेस पक्षाचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या वेळी बोलताना इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की,  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे.
जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतुहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते.
     ते असे हि म्हणाले की इंदापूर तालुका काँग्रेस चा मी अध्यक्ष असताना मा राजीवजी सातव हे युवक काँग्रेसचे  राष्ट्रीय अध्यक्ष होते व महाराष्ट्राचे अध्यक्ष मा आमदार विश्वजीत दादा कदम होते ....निश्चितच जवळ पास महाराष्ट्रातील सर्वच कार्यक्रमला राजीवजी सातव असायचे त्या मुळे पक्षाच्या निवासी शिबिरात त्यांचा काम बघण्याची संधी खूप जवळून आली ...त्यांचे विचार त्यांची संघटने वरील निष्ठा व काँग्रेस पक्षावर असणारे प्रेम ह्यातून निश्चितीच माज्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळाली .
        आज त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे .
             या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस झकीर भाई काझी, इंदापूर तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष सीमा कल्याणकर, इंदापूर शहर अध्यक्ष चमनभाई बागवान, तालुका उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य आबासाहेब निंबाळकर, खजिनदार भगवान पासगे, तालुका सरचिटणीस निवास शेळके,तालुका युवक काँग्रेस चे सरचिटणीस मिलिंद साबळे, आदी पद्धधिकारी उपस्थित होते.
close