shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेकडून उपनगरात नालेसफाईचे काम सुरू...! स्थानिकांनी व्यक्त केल्या इतरही काही समस्या....!!


प्रतिनिधी । संजय वायकर :

नगर (दि.१९) : येथील सावेडी उपनगरातील निर्मलनगर भागात भगवानबाबा चौक येथे नाल्याचे सफाईचे काम करण्यात आले.



अगदी काही दिवसांवर येवून ठेपलेला पावसाळा आणि पावसाळा सुरु होण्याअगोदर विविध ठिकाणी नालेसफाई करण्याची नागरिकांची मागणी पहाता हे काम सध्या जोरात सुरु आहे .

महानगर पालिकेकडून नालेसफाईचे काम सावेडी परिसरा पासून तर सीना नदीपर्यंत करण्यात येणार असल्याचे पालिकेचे कर्मचारी मच्छिंद्र यांनी सांगितले .

स्थानिक नागरिकांनी या कामा बद्दल समाधान व्यक्त करतानाच येथील नाल्याच्या आजूबाजूला असणारे अतिक्रमण याबद्दल नाराजी व्यक्त केली . या अतिक्रमणामुळे नाल्यातील गाळ टाकण्यासाठी व्यवस्थित जागा नव्हती . 

नागरिकांच्या म्हणण्यानुसार नाल्याच्या मागील बाजूस प्ले ग्राऊंड आहे पण तेथे अतिक्रमण करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढून घ्यावे असे  स्थानिक नागरिक सांगत आहेत.
close