shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांचे विनंतीवरून तुर्तास स्थगित ...!



परंतु कोरानाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यावर पुन्हा मोठ्या ताकदीने  बेमुदतआमरण उपोषण करणार असल्याचा दिला इशारा- सुरेश दहेकर


प्रतिनिधी । संजय वायकर:-

भंडारा (दि.१) : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दिवशी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले .

*यात प्रामुख्याने १ एप्रिल २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करून राज्य शासनाचे कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, वेतन आणि भत्ते लागू करावेत अशी मागणी  केली आहे.
            श्री.सुरेश दहेकर

कोरोना सारख्या महामारीच्या काळात प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन सुरु करण्यात आले. यात भंडारा, तुमसर , गोंदिया , साकेली आणि पवनी चे एसटी कर्मचारी व त्यांचा परिवार सहभागी झाला.

या आंदोलनाची जिल्हा प्रशासन , पोलिसप्रशासन यांचेकडून दखल घेण्यात आली असली तरी त्यांनी हे आंदोलन कोरोना सारख्या महामारी च्या काळात करू नये अशी विनंती केली आहे ..!

परिणामी संबंधीत प्रशासनाच्या विनंती वरून हे बेमुदत आमरण उपोषण संध्याकाळी संबंधीत विभागाला पत्र देऊन स्थगित करण्यात आले.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आणि नियंत्रणात आल्यावर सदर बेमुदत आमरण उपोषण पुन्हा मोठ्या ताकदीने एसटी कर्मचारी सहपरिवार करणार असल्याचा इशारा विभागीय कर्मचारी सुरेश दहेकर यांनी दिला आहे.
close