shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून फरार असलेले जामखेड चे माजी उपसभापती करमाळा पोलिसांनी केले गजाआड..!!

प्रतिनिधी । संजय वायकर :

करमाळा : (दि .२९ ) : येथील पोलीस ठाणे भाग 5 व पर्यावरण कायदा कलम 9 व 15 मधील फरार आरोपी  दीपक नानासाहेब वाळुंजकर रा .जवळा ता .जामखेड जिल्हा अहमदनगर हा एक वर्षापासून फरार होता. 

आज दि .29 .5 . 2021 रोजी आरोपी हा पोथरे गावच्या शिवारात आला असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर पो .कॉ .चंद्रकांत ढवळे पो.कॉ . तोफिक काझी कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांनी फरारी आरोपी दीपक नानासाहेब वाळुंजकर याला ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.

सदरची कामगिरी ही मा .पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते मॅडम मा .अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे माननीय उपविभागीय अधिकारी डॉ . विशाल हिरे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि तळपे हे करीत आहेत.
close