shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गर्भवतींच्या लसीकरणाला पालिकेची परवानगी..!

जबाबदारी मात्र महिला आणि संबंधित डॉक्टरांची..!

संशोधनात्मक अभ्यासाशिवाय लसीकरण धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत..!

मुंबई : करोना प्रतिबंधासाठी सध्या दिली जाणारी लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का ? याबाबत अद्याप ठोस पुरावा नसताना मुंबई महापालिकेने मात्र गर्भवती महिलांना लस घेण्याची परवानगी दिली आहे. 
मात्र त्याच वेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी महिलेवर ढकलून पालिकेने हात वर केले आहेत. 
लस घेण्यासाठी महिलेकडे डॉक्टरांचे पत्र असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर महिलेचे संमतीपत्रक असणेही बंधनकारक केले आहे. 

दरम्यान, कोणत्याही संशोधनात्मक अभ्यासाशिवाय गर्भवती महिलांना लस धोकादायक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. करोना प्रतिबंधक लशीच्या चाचण्या गर्भवती महिला आणि स्तनदा मातांवर झालेल्या नसल्यामुळे यांना लसीकरणाच्या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले नव्हते. 

गेल्याच आठवडय़ात केंद्रीय आरोग्य विभागाने स्तनदा मातासांठी ही लस सुरक्षित असल्याचे जाहीर करून त्यांनाही करोनाप्रतिबंध लस घेता येईल असे स्पष्ट केले. 
परंतु यात गर्भवती महिलांचा समावेश करण्यास केंद्रीय आरोग्य विभागाने अद्याप संमती दिलेली नाही. 
राज्याच्या आरोग्य विभागानेही केंद्राच्या सूचनांचे पालन करत स्तनदा मातांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

गर्भवती महिलांच्या लसीकरणाला राज्याच्या आरोग्य विभागानेही परवानगी दिलेली नाही. 
अशा स्थितीत मात्र पालिकेने स्तनदा मातांसह गर्भवती महिलाही लस घेऊ शकणार आहेत,असे जाहीर केले.
close