shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सौरव हाडवळे यांनी २०० पेक्षा जास्त वाफेचे स्टीमर मशीनचे वाटप..!!


शिर्डी । प्रतिनिधी ( तुषार महाजन ) :
शिर्डी शहरातील वॉर्ड क्रमांक 14 मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शिर्डी शहर अध्यक्ष सौरभ विठ्ठल हाडवळे यांच्या उपक्रमातून नागरिकांना भेट म्हणून वाफेचे मशीन वाटण्यात आले वाढत्या कोरोना च्या प्रादुर्भावा पासून बचाव करण्यासाठी एक छोटासा उपक्रम म्हणून नागरिकांना वाफेचे मशीन वाटप करण्यात आले.

या वाफेचे मशीन ची वाफ घेतल्याने घेतल्याने सर्दी खोकला होणार नाही किंवा तो कमी होण्यास मदत होईल यासाठी हे वाफेचे मशीन नागरिकांना देण्यात आले या उपक्रमा प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिर्डी शहर संघटक लक्ष्मण अण्णा कोतकर, हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष महेंद्र काटकर, स्नेह वाडेकर, विनायक शिंदे,अमोल जाधव, शिवम डांगे, महेश चौधरी, योगेश निरभवणे, मयुर आडागळे, ऋषी सोनवणे, किरण भागवत, विठ्ठल जाधव, सागर त्रिभुवन, तेजस सुरासे आदी मित्रपरिवार उपस्थित होते.
close