शिर्डी । प्रतिनिधी ( तुषार महाजन ) :
भारतीय जनता पार्टी व आर्ट ऑफ लिविंग यांच्या माध्यमातून जिल्हाउपाध्यक्ष श्री.अशोक पवार, डॉ. श्री.अरुण जानी, श्री.राजेश टिक्क्यानी यांचे संकल्पनेतून सेवा हि संघटन या उपक्रमा अंर्तगत कोविड सेंटर मध्ये आनंदी व तणाव मुक्त जीवनासाठी "नवचेतना " योग, प्राणायाम, ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थांनच्या कोविड सेंटर मधून जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्रजी गोंदकर, साईबाबा सुपर हॉस्पिटलचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी श्री.प्रीतमजी वडगावे यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून हे "नवचेतना" शिबिर विविध कोविड सेंटर मध्ये राबिवण्यात येणार आहे. याप्रसंगी युवा मोर्चा चे प्रदेश सदस्य श्री.किरण बोराडे, श्री.संजय जगताप, श्री.अमोल बढे आदी उपस्थित होते.

