shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गाव तिथे लसिकरण मोहिम अंतर्गत दहिगाव येथे १२० लसिकरण मोहिम संपन्न..!



नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील रुईछत्तीसी प्राथमिक उप आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दहिगाव या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सकाळी लसिकरण मोहिम सुरू करण्यात आली. दहिगाव मध्ये लसिकरण पहिल्यांदा होत असल्याने गावातील नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन लसिकरण मध्ये लस कोण पहिला डोस घेतला तर कोणी दुसरा डोस घेतला.

लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. गाव तिथे लस मोहिम सुरू करण्यात आली आहे.आसपासच्या गावातील इतर लोक आल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला होता. गावातील काही नागरिकांनी लस न मिळाल्याने नागरीक नाराज होऊन आपल्या घराकडे पलतले. आँनलाईन नोंदणी सेंटर गावाकडे येत असल्याने नगर शहर तसेच इतर गावातील नागरीक आँनलाईन नोंदणी केल्याने ज्या ठिकाणी गाव तिथे लस ठेवली त्यात गोंधळ निर्माण होत आहे.  

या वेळी काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.गावातील जेष्ठ नागरिकांनी समजुत काढल्याने गर्दी आटोक्यात आली, यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, उपसभापती रविंद्र भापकर,
वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल ससाणे, सविता ससाणे, संरपच मधुकर म्हस्के, उपसरपंच महेश म्हस्के,सुनिल सर, आरोग्य साहिका लता कालेॅ, समुदाय अधिकारी सुर्यकांत यादव, आरोग्य सेविका मनिषा बनसोड,डाॅ मनिष हिवाळे, आरोग्य सेवक संदिप भालसिंग, आशा सुपर वायझर विजया लंके, अंगणवाडी सेविका कमल जरे, आशा सेविका आशा जाधव,सुनिता वाघ,संजय आन्हाड ,ग्रामपंचायत कर्मचारी पाराजी माने लसिकरण मोहिम यशस्वी होण्यासाठी नागरीक,तसेच आदि कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
close