वंचित बहूजन आघाड़ीचे विधायक कार्य:-
शेवगाव:- शुक्रवार दि ७/५/२०२१ रोजी शेवगांव नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना वंचित बहूजन आघाड़ी तर्फे कोवीड सेंटर मध्ये काम करणार्या शेवगांव नगर परिषद कामगारांना कोवीड सुरक्षा किट त्वरीत मिळावे या करिता शेवगांव नगर परिषद मुख्याधिकारी मा गरकळ साहेब यांच्या हस्ते प्रशासक मा देवदत्त केकाण साहेब यांना देण्यात आले.
या प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई कामगार संघटना अध्यक्ष मा रमेश खरात वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका संघटक शेख सलीम जिलानी हे उपस्थित होते.
या निवेदनात १) कोवीड सेंटर मध्ये काम करणार्या शेवगांव नगर परिषद कामगारांना कोवीड सुरक्षा किट त्वरीत मिळावे २) मागील ज्या कामगरांचे ३,४,५,६ महीन्याचे वेतन नगर परिषदेने थकीत ठेवलेले आहे ते त्वरीत देण्यात यावे ३)कोरोना मुळे मृत्यु झालेल्या दादासाहेब कणखरे यांना प्रशासका तर्फे योग्य मदत मिळावी ४) दादासाहेब कणगरे याच्या कुटुंबातील वारसाला नोकरीत सामावून घ्यावे ५)शासनाने जाहीर केलेल्या कामगार, कर्मचारी यांच्या विमा पॉलिसी ची अंमलबजावणी त्वरीत करावी ६)कामगारांची देखभाल करने त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक देणे.
या करिता सुशिक्षित मुकादमांची निवड करावी वरील मागण्या त्वरीत मान्य कराव्या अन्यथा शेवगांव नगर परिषद कामगार, कर्मचारी तसेच वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते हे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर यांच्या नेतृत्वाखाली शेवगांव नगर परिषदे समोर*काम बंद ठिय्या आंदोलन दि.११/५/२०२१ रोजी कोरोना महामारीच्या प्रतिबंधक नियमानुसार करतील असे लेखी निवेदन देण्यात आले

