नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
आज वार शुक्रवार (दि.७) में नगर तालुक्यातील टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सांडवे या ठिकाणी पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 60 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प घेण्यात आला.
या ठिकाणी या आधी काही व्यक्तींना प्रथम डोस घेतला तर काही दुसरा डोस घेतला. या कॅम्पचे उद्घाटन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड,प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी काझीचे डॉ.डॅनियल वाघमारे, डॉ. गीते मॅडम,प्रशांत कांबळे हे उपस्थित होते.हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच मंगलताई निक्रड,उपसरपंच परशुराम घोलप, मा.सरपंच अजय बोरुडे,गणेश खांदवे, अमोल निक्रड,बाळासाहेब खांदवे, बापूराव खांदवे,ग्रामसेवक सागर खळेकर,दिनेश करांडे सर,महेश खांदवे,त्रिंबक आरु,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभागातील कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

