वाढदिवसानिमीत्त गोरगरीबांना अन्नधान्य जिवनावश्यक वस्तूची मदत करुन जपली सामाजिक बांधीलकी ..!!
इंदापूर प्रतिनिधी
कोरोना रोगामुळे जगात हाहाकार माजला आहे अनेकांचे प्राण गेले आहेत रुग्णालय फुल्ल झाली आहेत रुग्णांना बेड मिळेणात ऑक्सीजनची कमतरता त्यामुळे अनेक रूग्णांचे जीव गेलेत इंजेक्शन व औषधांचा काळाबाजार हॉस्पीटल, अॅब्युलन्स , रुग्णांच्या’ अडचणीचा व गरजेचा फायदा उठवत आहेत डॉक्टर आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी जिवाची कुठूंबाची पर्वा न करता २४तास काम करत आहेत तसेच काहीसा शासन सामाजिक राजकीय संघटना देखील आपल्या परिने मदत करत आहेतपरंतु संकटच एवढे भयानक आहे की हे सर्व घटक करत असलेली उपाययोजना मदत अपुरी पडत आहे तर काही माणसे आपल्याकडे मदत करण्यासारखी परिस्थीती असताना माझे कुठूंब याचे पलिकडे पाहायला तयार नाहीत .
अशातच माणुसकीचा झरा शिल्लक असलेचे उदाहरण म्हणजे कालठण नं .१ येथील शशिकांत ( आण्णा ) पाटील यांच्या मित्रपरिवाराने माणुसकी जपत शशिकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोणताही वायपट खर्च न करता कालठण व इंदापूर येथील गोरगरीब कुठूंबांनालॉक डाऊनच्या काळात काम नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती अशा ७५ कुठूंबांना एक माहिना पुरेल एवढे साधारण प्रत्येकी ८००रूकिमतीचे किटचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले
व यावेळी आणखी काही मदत हवी असेल तर कळवा असे आव्हान त्यांनी केले.
गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही लॉकडाऊन मध्ये ही शशिकांत (आण्णा) पाटील व मित्र परिवाराच्या वतीने परिसरातील कुटुंबांना धान्य कीट तसेच मास्क, सॅनिटायझर वाटप करून सामाजिक उपक्रम राबवले होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शशिकांत ( आण्णा ) पाटील यांना फोन करुन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले या वेळी सोपान मांढरे ,वैभव गटकूळ,गौरव माने, शिवम गटकूळ,आदित्य कोळेकर उपस्थित होते

