प्रतिनिधी । सुर्यकांत होनप :
साहित्यिका व अखिल भारतीय क्षत्रिय महासभा-प्रदेश च्या अंजली राठोड श्रीवास्तव यांच्या कल्पनेतून ऑनलाइन काव्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
आजच्या कोरोणाच्या काळात लोकांची मानसिकता फारच ढासळली आहे. अशा परिस्थितीत लोकांची मानसिकता चांगली ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर नियोजन केले होते. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला.
साहित्यिका अंजली राठोड श्रीवास्तव
तालुका स्तरावरील या काव्य स्पर्धेत अर्चना माने प्रथम तर द्वितीय मितवा श्रीवास्तव व तृतीय रत्नमाला ह़ोरणे यांना सन्मानित करण्यात आले.तसेच चतुर्थ व पंचम क्रमांकावर अनुक्रमे प्राची सरवदे व विजयालक्ष्मी गोरे यांना सन्मानित करण्यात आले.
उत्तेजनार्थ मध्ये सारिका पुराणिक, सुलभा खुळे,हेमा विद्वत , सुजाता अनारसे यांना ही गौरविण्यात आले.
लक्षवेधी कविता म्हणून विनया घोलप पवार (पुणे)यांच्या कवितेची निवड करण्यात आली.
निकाल देण्याचं काम मुंबई च्या साहित्यिका मा.संजीवनी राजगुरू यांनी अगदी चोखपणे पार पाडले.
तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ सत्यपाल श्रीवास्तव, डॉ श्रीराम परदेशी, डॉ.बिपीन परदेशी ,मा. झनकसिंग परदेशी मा.पंकज परदेशी,मा.दिनेश राठोड यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुस्तके भेट देऊन कवयित्रींचा सन्मान करण्यात आला.

