प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :- दि. २४ / ०५ / २०२१
डॉ बाबासाहेब आंबेडकर ( अनुजाती ) माध्यमिक निवासी आश्रम शाळा पाथरा ता. केज येथील श्री. लहु बनसोडे संस्था प्रमुख ( डॉ बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ पाथरा) यांच्या वरच शासनाच्या गलथान कारभारामुळे आमरण उपोषणास बसण्याची वेळ आली आहे.
सदरील प्रकरणात मिळत असलेल्या माहिती नुसार श्री लहु बनसोडे यांनी निवेदन देऊन निवेदनात पुढील माहिती नमूद केली आहे.
मा . उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या कडे निवेदन करते संजय बनसोडेसह सात जण नियुक्ती झाल्यापासून शाळेवर कधीही नोकरीला आलेले नाहीत. दिनांक 8 मार्च 2019 रोजी रोजी 20 टक्के अनुदान मंजूर झाले त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून खोटे नाटे करून आम्हाला काढून टाकले आहे .
अशी खोटी तक्रार जलील शेख प्रादेशिक उपायुक्त औरंगाबाद यांच्या कडे देऊन दिलेला निकाल व आदेश रद्द करण्यासाठी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मान्यता मिळाल्यापासून 100% अनुदान देण्यासाठी व शाळेला अनुदान मिळण्यासाठी तसेच अनुसूचित जातींच्या संस्थाचालकांना संरक्षण मिळण्यासाठी श्री लहु बनसोडे संस्था प्रमुख हे आमरण उपोषणास बसले आहेत.
तरी शासकीय यंत्रणेने या सर्व गोष्टीचा सखोल अभ्यास करून डॉ बाबासाहेब आंबेडकर ( अनुजाती) माध्यमिक निवासी आश्रम शाळा पाथरा व श्री लहु बनसोडे संस्था प्रमुख यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी होत आहे.

