प्रतिनिधी । आसावरी वायकर :
शेवगाव (दि.२४) : रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी च्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे सेन्ट्रल ऑक्सिजन लाईन चा शुभारंभ तहसीलदार अर्चना भाकड यांच्या हस्ते करण्यात आला.
सेन्ट्रल ऑक्सिजन लाईनसाठी रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी चे डायरेक्टर तथा बी जे मुरदारे कन्स्ट्रक्शन चे मालक बाळासाहेब मुरदारे, नाशिक चे डॉ. महेंद्र नाकील सह इंजि. मित्र मंडळ पुणे व साईपुष्प कोविड सेन्टरचे प्रमुख डॉ . प्रल्हाद पाटील यांनी प्रत्येकी एक लाख अशी सुमारे साडेतीन लाख खर्चाच्या लाईनसाठी रो बाळासाहेब मुरदारे, प्रा दिलीप फलके, डॉ . भागनाथ काटे, डॉ . संजय लड्डा यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेन्टरसाठी श्री रेणुकामाता मल्टिस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव यांनी ऑक्सिजन कॉन्सन्टरेटर मशीन, श्रीकांत इलेक्ट्रिकल चे श्री वल्लभशेठ लोहिया यांनी प्रत्येक बेडसाठी वाफेचे मशीन व इलेक्ट्रिक साहित्य, आबुधाबी मारवाडी सेवा संघाच्यावतीने कोविड रुग्णांसाठी औषधे डॉ . काटे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.
कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय शेवगाव चे वैद्यकीय अधीक्षक डॉ . रामेश्वर काटे, ग्रामीण रुग्णालय बोधेगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक परदेशी, रोटरी चे अध्यक्ष किसनराव माने, सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, श्री सुनील रासणे, श्री विष्णु गायकवाड, श्री मयूर वैद्य, श्री एकनाथ कुसळकर, तालुक्यातील सन्माननीय पत्रकार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो डॉ . भागनाथ काटे यांनी केले तर डॉ . विजय लांडे यांनी आभार मानले.

