श्रीरामपूर । प्रतिनिधी (राजेंद्र देसाई ): शहर पोलीस स्टेशनचे पोनि संजय सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत आरोपी बल्ली उर्फ बलराम रामचित यादव रा.सरस्वती कॉलनी वार्ड नं.७ श्रीरामपूर हा जबरी चोरी करण्याचे उददेशाने हुसैननगर कडुन खबडीकडे जाणारे रोडवर ॲक्टीवा मोटारसायकलवर फिरत आहे.अशी गोपनीय बातमी मिळाले वरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन
त्यास शिताफीने पकडले.
सदर आरोपीची अंगझडती व ॲक्टीवा गाडीची झडती घेतली असता ॲक्टीवा गाडीचे सीटखाली असलेल्या डिक्कीमध्ये एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस असा ६५,०००/- रुपयाचा मुददेमाल मिळुन आला आहे. करीता नमुद आरोपीविरुदध पोकॉ/१२१० किशोर सुभाष जाधव नेम- श्रीरामपूर शहर पोस्टे यांचे
फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि नं. ॥ २४८/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीस मा.न्यायालयास हजर केले असता त्याला मा.न्यायालयाने दिनांक ०६/०५/२०२१ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. तसेच पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर येथे दाखल असलेल्या एका मोक्का प्रकरणातील आरोपी नईम मेहमुद सय्यद रा.अचानक नगर वार्ड नं.१ श्रीरामपूर याचा तो साथीदार असून दोन्ही आरोपीतांनी चैनस्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत.
आरोपी बल्ली उर्फ रॉकी उर्फ बलराम रामचित यादव वय २५ वर्ष रा.सरस्वती कॉलनी वार्ड नं.७ श्रीरामपूर हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुदध यापुर्वी खालीप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि.नं. १ ३६१/२०१८ भादवि कलम ३९२,३४ ,२) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि.नं. १ २९९/२०१७ भादवि कलम ३९२,३४; ३) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि.नं. १ २९०/२०१७ भादवि कलम ३७९; ४) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरजि.नं १३६१/२०१८ भादवि कलम ३९२,३४ (फरार); ५) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरजि.नं ११३६/२०१४ भादवि कलम ३९२,३४; ६) शिर्डी पोस्टे गुरजि.नं. ११२९/२०१७ भादवि कलम ३९२,३४; ७) तोफखाना पोस्टे गु रजि.नं. ११७/२०१७ भादवि कलम ३९२,३४; ८) तोफखाना पोस्टे गु रजि.नं. 1 ५१४/२० भादवि कलम ३९२,३४; ९) तोफखाना पोस्टे गु रजि.नं. ११४/२०१७ भादवि कलम ३९२,३४; १०) कोपरगाव शहर पोस्टे गु रजि.नं. १ ३६/२०१८ भादवि कलम ३९२,३४; ११) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरजि नं. १५५/२०२० भादवि कलम ३९२,३४ (फरार) ;१२) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरजि नं. ६९/२०२१ भादवि कलम ३९९,४०२ सह आर्मॲक्ट ४/२५ (फरार)
सदरची कौतुकास्पद कामगिरी श्री.मनोज पाटील सो.पोलीस अधीक्षक अहमदनगर श्रीमती दिपा काळे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री.संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांचे
मार्गदर्शनाखाली पोनि श्री.संजय सानप,पोहेकॉ/१२०३ जोसेफ साळवी,पोकॉ/१२१० किशोर जाधव,पोकॉ/६५१
राहुल नरवडे, पोकॉ/२२७० पंकज गोसावी,पोकॉ/१८४ राहुल गायकवाड, पोना/१४५२ करमल,पोकॉ/१७३ सुनिल दिघे यांचे पथकाने केलेली आहे.

