प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे इंदापूर तालुका सचिव धनंजय कळमकर व संघटक दीपक खिलारे यांनी केली मागणी.
इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे इंदापूर तालुका सचिव धनंजय कळमकर व संघटक दीपक खिलारे यांनी केली. आहे. तालुक्यात कोरोना वाढत असून, बाधित रूगणांची संख्या दररोज तीनशेच्या आसपास आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर, लसीकरण केंद्र एकाच इमारतीत आहे. येथे शंभरहून अधिक कोरोना रूणांवर उपचार सुरू असून त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार रुणालयात इकडे तिकडे फिरत असतात. त्यातच संशयित नागरिकांची 'आरटीपीसीआर', रॅपिड अँटीजेन चाचणीदेखील उपजिल्हा रुणालय आवारात होते. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रही याच इमारतीत आहे. उपजिल्हा रूणालयात नागरिकांची मोठी वर्दळ होत असल्याने, तेथे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्काळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र शहरामध्ये सुरक्षित ठिकाणी हालवावे अशी मागणी परिषदेच्या वतीने तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
नागरिकांचे सुरक्षित लसीकरण होण्यासाठी प्रशासनाने शहा सांस्कृतिक भवनचा वापर करावा असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा, श्री नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मुकुंद शहा व भरत शहा यांनी तीन आठवड्यांपूर्वी केले. मात्र, प्रशासनाने यासंदर्भात सूचक मौन बाळगले असून अधिकारी एकमेकांवर टोलवाटोलवी करत सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्रंदिवस जनतेच्या कल्याना साठी झटत आहेत, आणी दुसरीकडे प्रशासनातील अधिकारी मात्र कोरोना वाढवण्यात मदत तर करत नाहीत ना,यावर आयुष प्रसाद सीओ गप्प का बसले आहेत, हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे.

