shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाधिकारी यांनी एसटी चालकांना ॲम्ब्युलन्सवर काम करण्याचे काढलेत आदेश ..!!


कोरोना योद्धा यादीतूनही वगळलेत एसटी कर्मचारी :- राकेश कांबळे

प्रतिनिधी : संजय वायकर
कोल्हापूर : मलकापूर आगारातील पाच चालकांना  विना संमती ॲम्ब्युलन्सवर चालक म्हणून काम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश प्रसारित केले आहेत. 

हे चालकांच्या दृष्टीने अन्यायकारक व हानीकारक असून चालकांना आपली जनहितार्थ प्रवासी सेवा सोडून आरोग्य कर्मचारी यांचे कामाचे ठिकाणी काम करावे लागणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत असून असंतोष ही पसरत आहे. तसेच संताप ही व्यक्त केला जात आहे .

*या निर्णयाचा संबंधीत प्रशासनाने फेरविचार करावा यासाठी मलकापूर आगारातील महाराष्ट्र एसटी वर्कर्स चे सचिव राकेश कांबळे यांनी मलकापूर आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन विनंती केली आहे .

अन्यथा या कर्मचाऱ्यांना राज्यशासन अंगीकृत आरोग्य सेवक कर्मचारी म्हणून आरोग्य खात्यामध्ये वर्ग करून शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे वेतन, वैद्यकिय सुविधा , विमा संरक्षण इत्यादी सेवा देवून त्यांचा आरोग्य खात्यात समावेश करावा अशी विनंती केली आहे . 

*हे पत्र विभाग नियंत्रक कोल्हापूर, तहसिलदार शाहुवाडी , महाव्यवस्थापक मुंबई, मुख्य कामगार अधिकारी मुंबई , तसेच इतर संबंधीत सर्व विभागांना देण्यात आल्याचे राकेश कांबळे यांनी सांगितले .

*या आदेशाचा संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी चालकांमध्ये संताप व उद्रेक होणार नाही याची  संबंधित प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन या पत्रा द्वारे करण्यात आले आहे .
close