shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदी सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमोलराजे इंगळे यांनी केला पोलीस बांधवांचा सन्मान..!!

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदी सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमोलराजे इंगळे यांनी केला पोलीस बांधवांचा सन्मान..!!
सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर अमोलराजे इंगळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून केला सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी: दि.३०मे २०२१ रोजी पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांना सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजप युवा कार्यकर्ते अमोलराजे इंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यातील हिंगणगाव पाटी येथे पुणे व सोलापूर सीमेवर कोरोना काळात आपले अहोरात्र कर्तव्य बजावत असणारे पोलिसांचे कोरोना योद्धा म्हणून हार फेटे घालून सन्मान व त्यांना फळे वाटपाचा कार्यक्रम त्यांनी संपन्न केला.
या कार्यक्रमाप्रसंगी अमोलराजे इंगळे  आपले मनोगत  करताना म्हणाले की, आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सात वर्ष पूर्ण केले. सात वर्षांमध्ये केंद्रात त्यांच्या नेतृत्वात यशस्वी सरकार चालवणाऱ्या या पंतप्रधानाच्या कार्याबद्दल भाजप नेते माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पुणे सोलापूर हायवेवर सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर हिंगणगाव पाटी येथे कोरोना काळात अहोरात्र कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांची कोरोना योद्धा म्हणून सन्मान करून त्यांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमास पोलिसांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल आणि सन्मान स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानून इथून पुढे त्यांच्या हातून चांगल्या प्रकारे जनतेची सेवा अशाच पद्धतीने घडो या शब्दात  आपले मनोगत व्यक्त केले.
अमोल राजे इंगळे यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम  आगळावेगळा असल्याने आणि अहोरात्र कर्तव्य बजावत असणाऱ्या डॉक्टर, नर्स व इतर सेवा बजावणाऱ्या या योध्या प्रमाणे पोलीस हे अहोरात्र योध्या प्रमाणे कर्तव्य बजावत असतात त्यांचाही कोरणा योद्धा म्हणून सन्मान केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी संजय मोरे महाराज, नारायण आसबे, किरण सरडे, तात्यासो यादव इत्यादी उपस्थित होते.
close