भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका अध्यक्ष मा.श्री गणेश चिवटे यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरात १०७ जनांनी केले रक्तदान
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप.
करमाळा: दि. ३०/०५/२०२१ रोजी भाजपच्या केंद्र शासनाचे सात वर्षपूर्ती निमित्त भा.ज.प. ता.अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरास कुर्डूवाडी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. श्री. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप साहेब (करमाळा) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या काळात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराने गरजवंत रुग्णांना आधार मिळेल. या रक्तदान शिबिरास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला या रक्तदान शिबिरात दिवसभरात एकुण १०७ जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री जयंत दळवी (पत्रकार पुण्यनगरी), मा.श्री.आण्णासाहेब काळे (पत्रकार सकाळ), आदिनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन संतोष जाधव पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण, बोकन, विस्तारक भगवानगिरी गोसावी, तालुका सरचिटणीस सुहास घोलप, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब होसिंग तसेच सर्व भा.ज.प.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान केलेल्या सर्वांचे मा. गणेश चिवटे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

