हर्षवर्धन पाटील यांचेकडून बोडके कुटुंबियांचे सांत्वन
फोटो:- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पिंपरी बु. येथे बोडके कुटुंबीयांचे सांत्वन केले.
इंदापूर: प्रतिनिधी (दि.३०/५/२१)
पिंपरी बु.येथे लोकनेते स्व.पांडुरंग बोडके यांच्या कुटुंबियांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.३०) भेट घेऊन सांत्वन केले. सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग बोडके ( वय - ७६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले.
या सांत्वन भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी पांडुरंगनाना बोडके यांच्या आठवणींना उजाळा दिला. पांडुरंगनाना बोडके हे पिंपरी बु. ग्रामपंचायतीचे 15 वर्ष सरपंच होते. या परिसराच्या विकासामध्ये नानांचे मोठे योगदान आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. हर्षवर्धन पाटील यांनी सुमारे दोन महिन्यापूर्वी पिंपरी बु. येथे पांडुरंगनाना बोडके यांची सदिच्छा भेट घेतली होती.
या सांत्वन भेटीप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील तसेच बोडके कुटुंबातील तुकाराम बोडके, राजेंद्र बोडके, निरा भीमा साखर कारखाना संचालक संजय बोडके, सुनील बोडके, आबासाहेब बोडके उपस्थित होते.
_____________________________

