shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री श्री रविशंकर वाढदिवस निमित्ताने आरोळे कोविड सेंटर ला एक लाख साठ हजाराचे औषधे सुपूर्द..!!


*खर्डा व परिसरातील आर्ट ऑफ लिव्हिंग परीवारचे स्तुत्य उपक्रम.. 

खर्डा प्रतिनिधी-  अनिल धोत्रे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने श्री श्री रविशंकर (गुरुजी)यांच्या वाढदिवसा निमित्ताने आरोळे कोविड सेंटर ला एक लाख साठ हजार किमतीचे आवश्यक असलेले औषधाची मदत पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आले .

      
जामखेड तालुक्यातील एकमेव असा मोफत उपचार करणारे आरोळे कोविड सेंटर हे आहे    श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त  आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील सदस्यांनी आरोळे कोविड सेंटर ला आवश्यक असलेले एक लाख साठ हजार रुपयांचे औषदांच्या स्वरूपात भेट देऊन सामाजिक बांधिलकी राखले 

        
एक नावाजलेले मानवतावादी नेता म्हणून श्री श्री रविशंकर यांच्याकडे बघितले जाते.त्यांच्या प्रेरणेने नैसर्गिक आपत्तीग्रस्त, आणि युद्धात बचावलेले,उपेक्षित आणि सतत संघर्षात भरडल्या जाणा-या जमातीतील मुले अशा विविध परिस्थितीतील लोकांना दिलासा देण्याचे काम चालू आहे.त्यांच्या संदेशाच्या सामर्थ्र्याने अध्यात्मावर आधारित एक सेवा कार्याची लाट आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील  समस्त कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.जगभर हे कार्यकर्ते आणीबाणीच्या परिस्थितीत या उपक्रमांना पुढे नेण्यात येत आहे .
      
जगभरातील करोडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे.वंश,राष्ट्रीयता आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन “वसुदैव कुटुंबकम” स्थापित करण्याची प्रेरणा जगभर देत आहेत.' सेवाभाव आणि मानवतावादी मूल्ये जोपासल्यास आंतरिक आणि बाह्य शांती,तणावमुक्त-हिंसामुक्त समाजाची निर्मिती सहज शक्य आहे ' हा संदेश त्यांनी दिला आहे.
 
याच अनुषंगाने खर्डा आणि परिसरातील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील सदस्यांनी  आरोळे कोविड सेंटर ला जामखेड पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत औषध साठा सुपूर्द करण्यात आले . 

यावेळी परिवारातील संतोष थोरात ,रवी कुलकर्णी, कांतीलाल खिवंसरा,शिवाजी भोसले ,  चंद्रकांत गोलेकर,महेश लोंढे,कल्याण सुरवसे,गणेश  जोगदंड,महेश दिंडोरे,अनिल धोत्रे,संजय पाटील ,अशोक खारगे,किशोर शेवाळे ,भूषण शहा,सागर शहा, वैशाली थोरात, संजीवनी पाटील,पत्रकार दत्तराज पवार,गणेश जव्हेरी पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार कोळी आदी उपस्थिती होते .
close