प्रमोद चौधरी, जळगाव जिल्हा प्रतिनिधी
एरंडोल -9960595807
जळगाव जि्ह्यातील सध्या कोरोना काळात काही दवाखाने व डॉक्टर कोरोनाच्या नावाखाली रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी उकळत आहेत परंतु आजही माणुसकी जिवंत आहे व डॉक्टरांना देव मानले जाते त्याची प्रचिती नुकतीच दिसुन आली.
तळई येथील आनंदा सुखदेव पाटील व त्यांची पत्नी दोघेही पाचोरा येथील नवजीवन कोविड सेंटर मध्ये कोरोनावर उपचार घेत होते परंतु घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी आपली शेती गहाण ठेवून बिल भरले व आपला जीव वाचवला. नवजीवन कोविड केअर सेंटरच्या डॉक्टरांना या बाबत माहीत झाल्यावर तेथील डॉ. जीवन पाटील,डॉ.वीरेंद्र पाटील,
डॉ.अभिलाष बोरकर,आनंद मेडिकल चे नंदू प्रजापत यांनी तळई येथे जाऊन संपूर्ण बिलाची रक्कम परत केली.यावेळी आनंदा पाटील व त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता तसेच आपण प्रत्यक्ष देव तर बघितला नाही परंतु आज नवजीवन कोविड केअर सेंटरच्या डॉक्टरांना बघितल्यावर प्रत्यक्ष देव बघितला असल्याची भावना पाटील कुटुंबाने व्यक्त केली.

