shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लावा झाडे, जगवा झाडे..! ऑक्सिजनची पडणार नाही गरज कधी..!! निसर्गाची करणी नारळात पाणी....! गेले सांगूनी संत महात्मे तेच आधी...!!

लावा झाडे, जगवा झाडे..,
ऑक्सिजनची पडणार नाही गरज कधी..!
निसर्गाची करणी नारळात पाणी 
गेले सांगूनी संत महात्मे तेच आधी...!!

गेल्या दीड वर्षापासून कोरोना सारख्या संसर्गजन्य वायरेचा कहर भारतात नाही तर सर्व विश्वात हहंकार माजवून सोडला व आपले बस्तान बसत 
जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोट्यावधी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. 


व अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले त्याचे कारण की आपल्या भारतात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत गेली .कोरोना पॉझिटिव रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत होती.त्यावर एकच उपाय आहे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे.
म्हणतात ना जे पेराल ते उगवते, माणसाने स्वतःच्या हव्यासा पायी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडी केली. 
ते आशा रितीने मला सागावस वाटते 

करण्या जतन सोडूनी गेला,
तोडत त्या निसर्गाचे तू वृक्ष ..!
भूक भागवण्या तू माणसा,
प्रहार करता झाला की रे भक्ष..!!

माणसाने अशा प्रकारे वृक्षारोपण करण्या ऐवजी ते तोडत गेले व ते त्या जागेवर रस्ते सिमेंटच्या इमारतीचे मोठे मोठे टॉवर उभे केले.परिणाम बघाना आता कोरोनाच्या  महामारीत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे प्राण जात आहेत. ती आपल्याच चुकीने अशी परिस्थिती आली.

मृत्यूच्या अडकले दाडेत कैक, 
लोक आज तुझ्या त्या चुकीने..!
ऑक्सीजन निर्मिता निसर्गास,
नष्ट केला तूच एक वेळच्या भुकेने.!!

तो ऑक्सिजन निसर्ग आपणास तयार केलेल्या ऑक्सिजनवर रुग्णांचे प्राण वाचवले जात आहे, त्यासाठी अमाप पैसा मोजावा लागतो. 

तुकाराम महाराजांनी सांगितले आहे "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" त्यामुळे मानवाने आता भानावर येऊन मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करून त्याचे संवर्धन करावे. 
वृक्षरोपणाचे फायदे नैसर्गिक रित्या ऑक्सिजन निर्माण होतो.

पर्जन्य साठी योग्य वातावरण निर्मिती होते.
झाडे पर्यावरणातील नको असणारा कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषण करून मानवजातीसाठी अत्यावश्यक असणारा ऑक्सिजन वायू बाहेर सोडतो. 
म्हणून मी एक पत्रकार (संपादक )या नात्याने मी आपणास विनंती करून सांगतो की बाबांनो जागवा मंत्र तो म्हणजे. 
भाऊ लाव ताई लाव,
एक एक तुम्ही झाड...!
संगोपन करता स्वतःसाठी ,
करूया हो त्याची वाढ...!!

आता येणाऱ्या पिढीसाठी आपण एक संकल्प करूया पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून वृक्षरोपण करता वृक्ष संवर्धन करू या.

मी लावले माझ्या, 
परिसरात झाड.!
जिमेदारी माझीच, 
ते करण्या वाढ...!!

माहिती संकलन
सुनिल ज्ञानदेव भोसले
close