साई संस्थान प्रशासकीय व्यवस्थापक समिती, मुख्यमंत्री, महसूलमंत्र्याना पत्रव्यवहार
शिर्डी । प्रतिनिधी:-
शिर्डी संस्थानचे कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी संस्थान चे अधिकारी कि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,सामान्य नागरिकाला मोठा प्रश्न निर्माण झाला असुन शिर्डी साई संस्थान कोविड सेंटर च्या गलथान कारभारामुळे अनेक रुग्ण व नातेवाईक संतापले असल्याची प्रतिक्रिया अ.नगर जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी दिली.
साईबाबा संस्थान च्या माध्यमातून आज कोविड सेंटर सुरु केले आहे. हजारो रुग्णांनी तेथे उपचार घेतले आहे. परंतु आज तेथील सुरु असलेला विस्कळितपणा, माणसं पाहुन ट्रीटमेंट, वशिलेबाजी, बेजबाबदार पणा, आधिकारी वर्गाची मनमानी, नर्सिग स्टाफचं चिघाळलेलं आंदोलन, त्या आंदोलनाला असलेली राजकीय फुस, यातुन कोविड सेंटर मधील निरपराध रुग्णांचा जात असलेला बळी ही मोठी चिंतेची बाब आहे. याकडे कार्यकारी व उपकार्यकारी पुर्णतः दुर्लक्ष करत आहे
आज शिर्डी व साईबाबांचे नाव जगात आहे जगाच्या कानाकोपऱ्यात साईबाबांचा भक्त परिवार आहे. साईबाबा नी श्रध्दा व सबुरीचा संदेश दिला आहे. आज साई संस्थान च्या कोविड सेंटर च्या माध्यमातून सुरु असलेले कार्य नक्कीच निराशाजनक आहे. याबाबत भक्तपरिवार, परिसरातील नागरिक, उपचार घेत असलेले रुग्ण व त्याच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आज शिर्डीसह अहमदनगर जिल्हात कोरोनोने प्रचंड थैमान घातले असताना कोविड सेंटर मधील गलथान कारभार अभावी अनेक रुग्णांचे हाल होत आहे. रात्री आवरात्री पेशंट व त्याचे नातेवाईक हतबल झाले असताना त्यांना मदत करणाऱ्या रात्री आवरात्री धावुन जाणाऱ्या सचिन चौगुले सारख्या सामाजिक कार्यकर्ते वर सुड बुध्दीने खोटे गुन्हे दाखल केले हे निषेधार्ह आहे. असे खोटे गुन्हे दाखल झाले तर कोणी कुणाला मदत करेल का?
सामाजिक कार्यकर्ता वर खोटे गुन्हे दाखल करुन शिर्डी संस्थान चे कार्यकारी व उपकार्यकारी अधिकारी काहीही साध्य करु शकत नाही व कुणाचाही आवाज दाबु शकत नाही वा वस्तुस्थिती लपवु शकत नाही. आपले सुरु असलेले चुकीचे व विशिष्ट राजकीय चौकटीतील काम तातडीने थांबवून सर्वाना न्याय दिला पाहिजे ही सर्व माहिती साई संस्थान च्या प्रशासकीय व्यवस्थापक समिती, मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे, व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना पत्रव्यवहार केला असल्याची माहीती श्रीकांत मापारी यांनी दिली.

