shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुकडीचे उन्हाळी आवर्तन करमाळा तालुक्याला सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी- मा.आमदार संजयमामा शिंदे


प्रतिनिधी । सुर्यकांत होनप :
करमाळा :  कुकडीचे उन्हाळी आवर्तन सन 2020-21 मध्ये तलाव आणि बंधारे यामध्ये पिण्याचे पाणी सोडण्याची मागणी मा.आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे.

    

करमाळा मतदार संघ हा ग्रामीण विभागांमध्ये विभागलेला असून अनेक गावात उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांचे पाण्याची अत्यंत गैरसोय होत आहे.सध्या ग्रामीण भागांमध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे जनावरांचे व लोकांचे हाल होत आहेत.

    
करमाळा तालुक्यातील वीट, वंजारवाडी, भोसे, पिंपळवाडी, मोरवड, कोर्टी, सावडी, कुंभारगाव, जातेगाव, कामोने,ई. गावांना पाण्याचे हाल सोसावे लागत आहेत. तरी सदरच्या गावातील तलाव आणि बंधारेमध्ये पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मिटेल.
     
तरी वरील गावांमध्ये कुकडी उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी संबंधित विभागास सत्वर आदेश द्यावेत असे विनंती मा.आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
close