shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गावच्या मध्यवस्तीतले कोविड सेंटर स्थलांतरासाठी ऊर्जा राज्यमंत्री मा .प्राजक्त तनपुरे यांना दिले निवेदन ...!

कोविड सेंटर स्थलांतर न केल्यास ग्रामपंचायतीला दिला आंदोलनाचा इशारा - ग्रा.पं. सदस्या वंदना विधाते

प्रतिनिधी : संजय वायकर
जेऊर (दि.१०) : नगर तालुक्यातील जेऊर येथे लसीकरण व कोरोना विषयक आढावा घेण्यासाठी आलेले ऊर्जा राज्यमंत्री मा . प्राजक्त तनपुरे साहेबांना गावच्या मध्यवस्तीत असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कोविड सेंटर येथून हलवून  सुरक्षित जागी सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या वंदना दादासाहेब विधाते यांनी निवेदन दिले .
निवेदन देताना दादासाहेब विधाते


 गावातील नागरिकांनी या कोविड सेंटरच्या तक्रारीचा पाढाच वाचून दाखविला . हे कोविड सेंटर मध्यवस्तीत असल्याने आजूबाजूचे लोक कोरोना बाधित झाले असून येथील काही नागरिक कोरोना सेंटर च्या भितीने आपली घरे सोडून बाहेर गावी स्थलांतरीत झाली आहेत.

या कोविड सेंटरच्या समोरच पोस्ट ऑफिस आहे. येथे नागरिकांची गर्दी होते . प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे येथे पालन होत नाही . तसेच या कोविड सेंटरच्या अस्वच्छ वातावरणामूळे कोरोनाबाधित रुग्ण भरदिवसा आणि रात्रीही शेजारील ग्राऊंडमध्ये आणि बाहेर रस्त्यावर फिरत असतात. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न धोका निर्माण झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री .शामराव विधाते व श्री .दादासाहेब विधाते यांनी सांगितले .

येथील काही कोरोनाबाधित रुग्ण दारु पिऊन रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फेकून देतात  अशी नागरिकांनी व महिलांनी माहिती दिली .

डॉ. किशोर टापरे यांनी सांगितले की या कोविड सेंटरमुळे त्यांच्यासहित त्यांचे पूर्ण कुटुंब बाधित झाले होते . या ठिकाणी आजूबाजूचे आठ ते दहा लोक कोरोनाने दगावले असल्याची त्यांनी माहिती दिली .

सविता गुजर , नजबीन सय्यद मॅडम , घाडगे मावशी , तसेच प्रदिप खरपुडे ,बाबा तोडमल , रशिद सय्यद, ओमकार बनकर, विश्वास बोरुडे, सोमनाथ टिमकरे यांनी कोविड सेंटरच्या तक्रारींचा पाढाच वाचला .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हे कोविड सेंटर लवकरात लवकर स्थलांतर न केल्यास संबंधीत प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल न घेतल्यास   ग्राम पंचायत सदस्या वंदना विधाते यांनी स्थानिक नागरिकांसहीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
close