प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा (दि.१०) :
गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जाणारे पो.नि. सूर्यकांत कोकणे यांनी सहारा नगर येथे जुगाऱ्यांवर कड़क कारवाई केली.
पो.कॉ . तौफीक रज्जाक काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोहेकॉ.देवकर, पो.कॉ.गवळी आणि पो.कॉ. ढवळे हे खाजगी वाहनाने करमाळा शहरात पेट्रोलिंग करीत असताना सहारा नगर येथे आले असता बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सहारा नगर येथील जगदंबा हॉटेलचे समोर चिंचेच्या झाडाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक ५२ पत्त्यांचा डाव खेळत आहेत .
लागलीच दोन इसमांना पंच म्हणून बोलावून घेऊन त्यांना बातमीचा आशय समजावून सांगुन त्यांनी छापा घालण्यासाठी येण्यास होकार देताच दोन पंचांसह सदर बातमीतील ठिकाणचे थोडे अलीकडे वाहन उभा करून सदर ठिकाणी चालत गेले असता तेथे पाच इसम वर्तुळाकार बसून पत्त्याचे डावावर जुगार खेळत असल्याचे दिसले.
लागलीच सदर ठिकाणी त्यांना घेराव घालून जागीच पकडण्यात आले. ती वेळ दुपारी २:०० वा.ची होती. पकडलेल्या इसमां
समोर खालील वर्णनाचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे :
१) ४,१००/-₹ त्यात १००/-₹ दराची १० नोट, २००/₹ दराच्या १० नोटा, ५००/₹ दराच्या २ नोटा व१०/₹ दराच्या १० नोटा
२) ५,०००/- एक टेकनो कंपनीचा मोबाईल जु.वा.किं.अं.
३) ३,०००/- एक टेकनो कंपनीचा मोबाईल जु.वा.किं.अं.
४) ७,०००/- एक रेडमी ८ ए कंपनीचा मोबाईल जु.वा.किं.अं.
५)५,०००/- एक रेडमी नोट ७ प्रो कंपनीचा मोबाईल जु.वा.किं.अं.
६) ००.००₹ किमतीचा एक निळ्या शाईचा बॉल पेन चालू स्थितीत असलेला जु.वा.किं.अं.
७) ००.००₹ एक ५२ पत्त्यांचा डाव किं.अं.
८) ००.००₹ एक निळ्या शाईने लिहिलेला कागद त्यावर आकडे मोड केलेली किं.अं.२४,१००/₹ येणेप्रमाणे वरील वर्णनाचे जुगाराचे साधने ,रोख रक्कम ,मोबाईल गुन्ह्याचे तपासकामी पोहेकॉ/ ३१३ देवकर यांनी गुन्ह्याचे तपास कामी दोन पंचांसमक्ष जागीच जप्त करून घेऊन त्यावर पंचांचे व पोलिसांचे सह्यांचे कागदी लेबल लावले .
तरी वरील वेळी व ठिकाणी यातील पाचही आरोपी हे ५२ पत्त्यांचे पानावर पैसे लावून मन्ना नावाचा जुगार खेळताना जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईलसह मिळून आले आहेत. म्हणून पो.कॉ . तौफीक रज्जाक काझी यांची त्यांचे विरुद्ध सरकार तर्फे महा.जु. ॲ.क.१२ ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.
कुठल्याच गुन्हेगारांची गय केली जाणार नसून करमाळा तालुक्यातील गुन्हेगारी मुळापासून उखडून काढणार असल्याचे पो.नि. सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले .

