नगर प्रतिनिधी ( शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील दश्मीगव्हाण येथे कोरोणा लसीचे आयोजन करण्यात आले यामध्ये 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना ही लस देण्यात आली. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी प्रथमच घेतलेली आहे त्या नागरिकांनाही ही लस देण्यात आली.
लसीकरणावेळी दश्मीगव्हाण ग्रामपंचायत चे सरपंच उद्धव कांबळे यांनी लसीकरणाबाबत योग्य नियोजन करून सोशल डिस्टंसिंग फज्जा उडू नये यासाठी ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना ओळखपत्राद्वारे लस घेण्यासाठी नियोजन केल्याने गर्दी न होता लसीकरणाचे योग्य नियोजन झाले.नगर तालुक्यात प्रथमच लसीकरणा वेळी ग्रामपंचायतद्वारे ओळखपत्र देऊन लसीकरण करण्याचा उपक्रम कांबळे यांनी राबवला.
या लसीकरणाचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवसेनेचे युवा नेते प्रवीण कोकाटे, संतोष काळे, ग्रामपंचायत सदस्य जयसिंग काळे, बाळासाहेब काळे, आरोग्य अधिकारी प्रियंका शेंदुरकर, विकास वाघमारे, पोलीस पाटील जयसिंग काळे,आदिं ग्रामस्थ उपस्थित होते.

