shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव पोलीस बनले कोरोना बाधितांच्या कुटुंबांचा आधार..!!



( पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून ७० कुटुंबांना धान्य किटचे वाटप)


हिंगोली / प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

दि.१४ मे, संपूर्ण राज्यात करुणा महामारीने थैमान घातले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला या महामारीतून राज्य मुक्त व्हावे यासाठी राज्य शासनाच्या जिल्हा प्रशासनाकडे संचारबंदी लागू करण्यात आली आहे या संचारबंदी दरम्यान प्राधान्य कोरोना बाधित कुटुंबाची व गरीब गरजवंत उपासमार होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी आपल्या संकल्पनेतून जिल्हातील ठाणेदारांना सूचित करून कोरोना बाधितसह गरीब कुटुंबांना धान्य किट वाटप आज दि.१४ मे शुक्रवार रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस ठाण्याकडून उपविभागीय पोलीस अधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या हस्ते ७० कुटुंबांना मोफत धान्य किट वाटप करण्यात आल्याने सेनगाव पोलीसाकडून कोरोना बाधित व गरीब कुटुंबांना धान्य मिळाल्याने मोठा आधार मिळाला असल्याचे मत लाभार्थी यांच्याकडून व्यक्त होत आहे.



संपूर्ण राज्यात कोरोना महामारी या संसर्गजन्य आजाराने प्रचंड थैमान घातले असून त्यामध्ये अनेकांचे जीव जात आहे त्यामुळे अनेक कुटुंब बेघर होताना पहावाच मिळत आहे या महामारीतून मुक्तता व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठी खबरदारी व उपायोजना करण्यात येत आहे त्यामध्ये राज्यासह जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे या संचारबंदी मुळे सर्वसामान्यच्या हाताला काम नाही परिणामी अनेक कुटुंब धान्‍य विना उपासमारीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना मोफत धान्य वाटप करण्याच्या सूचना देताच पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्या पुढाकारातून आज शहरासह हद्दीतील कोरोना बाधित कुटुंबे व गरीब गरजवंत अशा एकूण ७० कुटुंबांना मोफत धान्य किट ग्रामीण उपविभागीय पोलीस अधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली या प्रत्येकी किटमध्ये ५ किलो गहू, २ किलो तांदूळ, १ किलो तेल,१ किलो मीठ, १ किलो तूर डाळ,१ किलो साखर,५० ग्राम हळद, शंभर ग्राम मिरची पावडर,५० ग्राम चहापत्ती पावडर अशा एकुण दैनंदिन लागणाऱ्या १० व्यक्तीचा एकत्र समावेश करुन सदर धान्य किट तयार करण्यात आली होती.

पोलीस प्रशासनाकडून मोफत धान्य किट दिल्याने सर्वसामान्य कुटुंबांना फार मोठा आधार बनला असल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन पहावयास मिळाले यावेळी ग्रामीण उपविभागीय पोलिस अधीक्षक विवेकानंद वाखारे,पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षाताई लोकडेमॅडम,पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे द्वारकादास सारडा आप्पासाहेब देशमुख गिरधारी तोष्णीवाल,राम गोपाल गट्टाणी,स्वप्निल तिवारी,गंगाधर सरकटे,पोलीस कर्मचारी रमेश कोरडे,बांगर,लेकुळे,वंजारी,चिंतारे,दीपा इंगोले,नरवाडे, लोणकर,सेवक प्रकाश सुतार आदींच्या उपस्थित मोफत धान्य किट वाटप करण्यात आले.

close