कोरोना काळात विनामूल्य मदत करणारा आकाश म्हणजे एक देवदुतच होय..!
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
कोरोनाच्या काळात ज्यांना कोरोना झाला आहे, अशा रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांच्या कायम संपर्कात असणारा आकाश डागवाले (फुले ब्रिगेड उपाध्यक्ष) आकाश चा मोबाईल नंबर 90490 44646 आहे. शिर्डी एक्सप्रेस च्या माध्यमातून हि माहिती सर्वांना मिळावी असे आकाशने विनंती केली आहे.
आकाश यांनी कोरोनाच्या काळामध्ये असंख्य रुग्णांना लागणारे बेड, कोरोना तपासणी सेंटर, कोविड सेंटर, नियंत्रण कक्ष नंबर, रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्धता, इंजेक्शन, प्लाझ्मा, रक्त, औषधे इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिले. या कामात त्यांनी आपल्या सर्व मित्रपरिवाराकडुन माहिती घेतली. कोणाचे नातेवाईक कुठे कुठे उपाचर घेत आहेत.त्या ठिकाणी बेड शिल्लक आहे का...? ऑक्सिजन बेड आहे का...? अशी सर्व प्रकारची माहिती गोळा करत करून ती माहिती गरजु व्यक्ती पर्यंत कशी पोहोचेल या साठी पुन्हा मित्रपरिवाराच्या साह्याने ती मदत गरजु रुग्णांपर्यंत पोहचण्याचे काम आकाश करत आहे. या माध्यमातून अनेक रुग्णांचे त्यांनी आशिर्वाद घेतले आहे. त्यांच्याकडे कुठलेही पद नसताना ना नगरसेवक, ना आमदार, केवळ मानवता धर्म पाळत त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
सर्वसामान्य कुटुंबातील असणारे युवक आकाश यांनी कोरोना रुग्णांना अनेक प्रकारची मदत मिळवून दिले आहे. कायम सहकार्याची भावना ठेवून त्यांनी कोणत्याची प्रकारची आपल्या कामाची प्रसिद्धी केली नाही. अशा निस्वार्थी युवक आकाश याने कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फार मोलाची मदत करीत आहेत. तसेच रुग्णांना अत्यंत आवश्यक असताना धीर देण्याचे कामपण ते करीत आहेत.
त्यांच्या या रुग्णसेवेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांचे आभार मानत आहेत.
त्यांच्या या कामाची दखल घेत दखल नगर "शिर्डी एक्स्प्रेस" ने त्यांना प्रसिद्धी देण्याचे ठरवून त्यांच्या कामास शुभेच्छा दिल्या.
अशाच प्रकारची रुग्णसेवा, समाजसेवा घडो अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांचे आभार मानले आहेत.

