shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राध्यापक किसन सुकटे यांचे दु:खद निधन...!



नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
'जोची आवडे सर्वांना ..तोच आवडे देवाला"..!  या म्हणी प्रमाणे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे चांदा या ठिकाणी  कै.किसनराव सखाराम सुकटे प्राचार्य म्हणून कार्यरत‌ होते.

अहमदनगर शहरात उपाचर सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षकी‌ पेशा असणारे किसनराव सुकटे हे मुळचे राजुरचे व नोकरीनिमित्त ते  नगर येथे वास्तव्य होते.जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.चांदा विद्यालयात त्यांच्या  पाठपुराव्यामुळे  तीन मजली भव्य दिव्य अशी इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.

त्यांनी शिक्षक म्हणून त्यांच्या काळात अनेक चांगले विद्यार्थी घडवले‌ अनेक विद्यार्थीना जिवन कसे जगावे, एक कृत्वान शिलवान मान सन्मानाने समाजात कसं जगावे हे नेहमी ते अध्यापनाचे काम करत असताना आधी मध्ये सल्ला देत असायचे. किसनराव सुकटे हे शांत, स्वभावाचे मनमिळाऊ व शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख होती.

त्यांनी आतापर्यंत घोडेगाव, नारायणडोहो, निघोज, गुंडेगाव, करंजी, चांदा आदी गावात प्राध्यापक ते  प्राचार्य पदा पर्यंत कारभार पाहिला. ज्या ठिकाणी नोकरी केली तेथे त्यांनी लोकांच्या मनात घर निर्माण केले.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली,एक भाऊ,  आई, वडील,बहिणी असा मोठा परिवार आहे. 
त्यांना नारायणडोहो ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच,सदस्य,नगर ग्रामीण पत्रकार संघ,व श्री चांगदेव विद्यालय यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
close