नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमध्ये एका क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याने हिम्मत दाखवत अखेर ब्लॅकमेलर टोळीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अधिकार्याकडे तीन कोटींची खंडणी त्या तरूणीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्याने कबूल केले होते. त्यातील 80 हजार रूपये त्याने दिले होते. त्यांच्या सोबत नाजूक संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये संबंधित तरूणीसह एजंट अमोल मोरे, सचिन खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे. सागर खरमाळे हा एका पोलीस कर्मचार्याचा भाऊ आहे.
दरम्यान या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

