प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी:
श्रद्धा वसंत जाधव (अध्यक्ष युवती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हडपसर विधानसभा मतदार संघ) व अभिमन्यू हरगुडे मा.अध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना पूजा जाधव गाव भोर यांनी सांगितले की, आपला भाऊ तुषार चंद्रकांत जाधव यांच्या वर पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले आहे,व आमची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे व हॉस्पिटलचे बिल खूप झाले आहे असे श्रद्धा ताई जाधव यांना सांगितले,श्रद्धा ताई जाधव म्हणाल्या काळजी करू नका अडचणीच्या वेळेस शिरूर-हवेलीचे आमदार कार्यसम्राट अशोक बापू पवार यांना विनंती करून आपण काहीतरी मार्ग काढू.
त्यानुसार श्रद्धा वसंत जाधव यांनी कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती यांना फोन केला. व पूजा जाधव यांच्या भावाच्या ऑपरेशनच्या खर्चा विषयी सविस्तर माहिती दिली, सर्व परिस्थिती ऐकून घेतल्यावर कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार म्हणाले काळजी करू नका आपण मार्ग काढू उद्या मला फोन करा.
आमदार अशोक बापू पवार यांनी तुषार चंद्रकांत जाधव यांचे बिल कमी करण्यासाठी एक पत्र दिले.
त्या मध्ये तुषार चंद्रकांत जाधव यांचे बिल कमी करण्यात यावे असे हॉस्पिटल प्रशासनास पत्र दिले.त्यानुसार हॉस्पिटलने तुषार चंद्रकांत जाधव यांचे बिल कमी केले.
त्याबद्दल पुजा जाधव यांनी कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार हे देवदुता सारखे आपल्या मदतीला धावून आले असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले, पूजा जाधव म्हणाल्या अशोक बापू पवार यांच्या रूपाने देवच आमच्या मदतीला आला.

