सांगली । प्रतिनीधी : अनिल पोवार
आळते : ( ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. ) येथील खाजगी हॉस्पीटल व मेडीकल स्टोअर्सच्या तपासणीसाठी आलेले डॉ. कोरे व त्यांच्या पथकावर ग्रामस्थांनी हल्लाबोल करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहुन आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई विनाच काढता पाय घेत पळ काढला. या घटनेमुळे गावात तणावपुर्ण शांतता असुन हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी व प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवुन माहिती घेतली.
याबाबत आधिक माहिती अशी की, आळते येथील डॉ. कोळाज यांच्याबाबत जिल्हाधिकांऱ्यांकडे तक्रार आली होती. त्या अनुषंगाने तहसिलदारांच्या सूचनेनुसार हातकणंगले पं. स. वैद्यकीय आधिकारी डॉ. सुहास कोरे व त्यांचे पथक आज दुपारी आळते ( ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. ) येथे खाजगी हॉस्पीटल व मेडीकल स्टोअर्सच्या तपासणीसाठी दोन सरकारी गाड्यांच्या ताफ्यातुन दाखल झाले. त्यांनी प्रथम एका मेडीकल स्टोअर्समध्ये कोणकोणती औषधे ठेवली जातात. याची विचारणा करून कोविडची लक्षणे असलेल्या औषधांची डॉक्टरची चिठ्ठी आल्यास प्रथमतः ती आमच्या मोबाईलवर पाठवायची सुचना देवून पथक खाजगी डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी गेले.पथकाची तपासणी सुरु असताना अचानकपणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने हॉस्पीटलमध्ये व रस्त्यावर जमा झाले. पथक कारवाई करणार हे समजताच ग्रामस्थ आक्रमक झाले. आक्रमक झालेले ग्रामस्थ डॉ. कोरे यांच्या अंगावर धावुन जावु लागले.
तर एकजण पथकाच्या गाडीच्या पुढे झोपुन आत्महत्या करणार असे ओरडु लागला. चिडलेले ग्रामस्थ व डॉक्टर यांच्यामध्ये वादावादी बराच वेळ चालु होती. अखेर पोलिस पाटील रियाज मुजावर व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी समझोत्याची भुमिका घेत वादावर पडदा टाकला. पण डॉ. कोरे यांच्या पथकाने ग्रामस्थांच्या गर्दीतुन सुटका करून घेवुन कारवाईविना पळ काढला.
याबाबत तालुका आरोग्य आधिकारी डॉ. सुहास कोरेनी सांगोतले की, ग्रामस्थांचा गैरसमज झाला होता. त्यांना समजावुन सांगितले आहे.
सदरची भेट ही नियमित तपासणीचा भाग आहे. घडलेल्या प्रकारामध्ये जमावाची आक्रमक मानसिकता होती. पण त्याचाव विचार करून चालणार नाही. सध्याच्या परिस्थितीत कोविड विरुद्ध लढायचे आहे.

