shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टीम कोविड केअर श्रीरामपूरने राबविला शहरासह तालुक्यात कोरोना जनजागृती कार्यक्रम ...!

श्रीरामपूर । प्रतिनिधी :.
'माणसा इथे मी तुझें गीत गावे,असे गीत गावे तुझे हीत व्हावे' हे ब्रीद उराशी बाळगून कार्यरत असणाऱ्या या टीमने जागृतीसाठी सुरु केलेल्या रिक्षातून कोरोना संदर्भात विनवणी करणारा आवाज घुमला आणि अबाल, वृद्ध,महिला भगिनी त्या आवाजाकडे लक्ष देऊ लागले. कोरोनाच्या या महा भयंकर लढ्यात आपण किती खंबीरपणे व सावधगिरीने सामोरे गेले पाहिजे याचे एक भावनिक आवाहन केले गेले.आपण सर्व च या संकटात होरपळत असताना आजही आपल्या आजूबाजूला आपले काही बांधव बेफिकीरपणे वागताना दिसत आहे.

अशांना 'प्रशासन आहे आपल्यासाठी, मात्र आपण आहोत आपल्या कुटुंबासाठी' असे भावनिक साद देण्याचे काम या द्वारे केले गेले. तसेच कोरोना संबंधित कुठलेही लक्षण दिसल्यास घरी थांबुन इतरांना बाधा पोहचवण्यापेक्षा त्वरित आपल्या जवळच्या किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करावेत, मास्क व सॅनिटायझर वापर करावा, वेळोवेळी हात धुवावेत, संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता घरातील लहान मुलांना संतुलित व पौष्टिक आहार द्यावा, शासन नियमांचे पालन करावे असे आवाहन लोकांना करण्यात आले.सदर जनजागृतीची ही रिक्षा 2 दिवस संपूर्ण शहरातील विविध भागात, प्रमुख चौकात जाऊन  आपले व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे सांगत धावत होती, त्यानंतर पुढील टप्प्यात तालुक्यातील भैरवनाथ नगर, सूतगिरणी परीसर,गोंधवणी, खैरी निमगाव, उंदिरगाव, हरेगाव,ब्राह्मण गाव वेताळ, शिरसगाव, अशोकनगर फाटा,अशोकनगर, निपाणी वडगाव, वळद उंबरगाव सह बेलापूर पंच क्रोशी व आस पासच्या सर्व वाड्या वस्त्या पर्यंत हा संदेश जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत पोहचवला गेला. प्रामुख्याने सरकारने ठरवुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सदर आवाहन करताना टीम कोविड केअर ने यावेळी लोकांना भावनिक साद घालण्याचे काम केले. 

ज्यामुळे शहर व तालुक्यातील अनेक नागरीकांनी फोन द्वारे समक्ष अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून टीमच्या या कामाचे कौतुक केले व धन्यवाद व्यक्त करून कामाची पावती दिली यातुन टीमच्या सदस्यांना यापुढे काम करण्यास एक नवीन ऊर्जा मिळाली.जन कल्याणाच्या या कार्यात सर्वच लोकप्रतिनिधीं चे मार्गदर्शन लाभत आहे. त्याबरोबरच प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.योगेश बंड, व शहर पोलीस निरीक्षक संजय  सानप व तालुका पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांचेही अनमोल सहकार्य लाभत आहे.  शहरातील लोकप्रिय निवेदक रमेश लांडे यांनी प्रचाराची जबाबदारी चोख पार पाडली.

टीम कोविड केअर श्रीरामपूर ने कोविडच्या या दुसऱ्या लाटेत सुरुवातीपासुन आपले सामाजिक भान जपत समाजातील तळागाळातील गोरगरिबांना  यातुन कसे वाचवता येईल किंवा या संकटाच्या समयी कशी साथ देता येईल हा विचार केंद्रस्थानी ठेऊन त्या दृष्टीने काम सुरू ठेवलेले असून भविष्यात देखील टीमने कुवतीप्रमाणे शक्य होईल तसा हातभार लावण्याचा संकल्प केलेला आहे,या कार्यात टीमचे सदस्य ऍड.समीन बागवान,कॉ. जीवन सुरुडे, नईम शेख,रवि त्रिभुवन सर,शरीफ शेख,अकबर पठाण,महेबूब शेख,मुद्स्सर शेख,कॉ.श्रीकृष्ण बडाख, चंदू मोरे,जावेद पठाण, फयाज इनामदार यांनी स्वतःला झोकुन दिलेले असुन सरकारने संभाव्यता  व्यक्त केलेल्या तिसऱ्या लाटेत ही सक्रिय राहण्याचा मानस व्यक्त केला आहे.


close