प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई-नेवासा तालुक्यात कोरोना महामारीचे संकट ऐन भरात असताना नेवासा तालुक्याच्या आरोग्य विभागाची खिंड सगळा आरोग्य यंञणेला बरोबर घेवुन लढवली. डाॅ.अभिराज दत्ताजी सुर्यवंशी हे नाव नेवासा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून अल्पावधीतच त्यांच्या कामामुळे व नम्र स्वभावाने परिचित झाल आहे.ते नेवासा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचं प्रशासन कुशलतेने चालवत आहेत !
तसेच त्यांच्यातील महत्वाचा गुण खुप मोठा आहे.यागुणामुळे कुणीही त्यांच्या प्रेमात पडेल ते म्हणजे त्यांची सिन्सीअरीटी आहे. अतिशय डाऊन टु अर्थ काम करणारे आरोग्य क्षेञातील सिंघमच आहेत.तसेच प्रशासकीय कौशल्य आणि स्वत: थेट मैदानात उतरुन काम करण्याची तयारी व हातोटी, नेतृत्व कौशल्य आणि कोरोनाचं वाढतं प्रमाण या सर्व पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्या बरोबर जिल्हाचा सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, अहमदनगर असा अतिरिक्त कार्यभार दिला गेलेले डाॅ.अभिराज सुर्यवंशी हे कोरोनात कुठेही कमी पडले नाही.याबद्दल नेवासा तालुक्याती तमाम जनता त्यांचे मनापासुन अभिनंदन करत आहेत.तसेच त्यांना नेवासा आरोग्य क्षेञातील सिंघम म्हणुण जनतेचे प्रेम मिळत आहे. डाॅ.सुर्यवंशी यांनी MBBS नंतर कम्युनीटी मेडिसीन ( PSM ) मधील MD या पदव्युत्तर पदवीचा आणि अनुभवाचा फायदा मोठ्या प्रमाणावर नेवासा तालुक्यातील जनसामान्यांना होत आहे. तसेच त्यांची एक गोष्ट म्हणजे प्रशासनात काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार समोर ठेवुन काम करत आहेत.
सेवा,निष्ठा आणि कर्तव्य या ञिसुञी नुसार काम करताना छत्रपती आणि मराठी माती हेच डाॅ.अभिराज सुर्यवंशी आहे ब्रिद वाक्य आहे.आज कोरोना महामारी असतानाच म्युकरमायकोसिस या काळी व पांढरी बुरशीजन्य आजाराची साथ आली.या संकटाला सामोरे जात असताना नेवासा सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक आणि सहाय्यिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक आणि सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आशा, आशा गट प्रवर्तक, परिचर, रुग्णवाहिका चालक आदी सर्वच जण गेल्या एक वर्षापासून जीवावर उदार होऊन लढत आहेत.अशा परिस्थिती मध्ये आपन आपल्या आरोग्य खात्यात जे चांगल्या काम करत आहेत त्यांचे कौतुकच केले पाहिजे.त्यांना आत्मिक बळ दिले पाहिजे.यातुन त्यांना काम करण्याची प्रेरणा भेटते.
कारण डाॅ.अभिराज सुर्यवंशी व त्यांची टिम सुमारे दिड वर्षा पासुन या महामारीशी राञ दिवस लढत आहेत.तालुक्यात राञदिवस कोरोनाचे पेंशट सापडत असताना डाॅ.सुर्यवंशी यांनी एकटाचा तालुकाभर सारखा दौरा सुरू असतो.आरोग्य यंञणेमध्ये काही कमतरता असेल तर त्याचा पाठपुरावा करणे.नेवासा,भेंडा,शनिशिंगणापुर,माका येथील कोविड सेंटर सुरू करणे त्यांना विविध आरोग्य सुविधेबाबत मदत देवुन ते अॅक्टिव ठेवणे असे मोठे आवाहनात्मक काम करत आहेत.हे सर्व करत असताना काही कमी जादा होते तसेच राजकिय इच्छाशक्तीचा अभाव असो किंवा विविध पक्षिय कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणे ही पण तारेवरची कसरत करताना त्यांच्या नम्र स्वभावाने ते सर्वांना सांभाळुन घेत आहेत.काही गावातील आरोग्य यंञणा ढिसाळ असेल तर त्यांना पण समजुन उमजुन सांगुन पुढे घेवुन जाण्याचे काम करत आहेत.सर्वांना बरोबर घेवुन जाणारे व सहकारी आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांना बरोबर घेवुन जाणारे डाॅ.अभिराज सुर्यवंशी जनतेसाठी चोविस तास फोनवर पण उपलब्ध असतात.डाॅ.सुर्यवंशी यांचा महत्वाचा त्याग म्हणजे त्यांची सर्व फॅमिली गावाकडे असुन ते स्वतः एकटे चोविस तास कोरोना महामारीशी लढत जनतेच्या आरोग्य जपत आहेत.अशा महान कोरोना योद्धाचा सन्मान या महामारीत त्यांच्या लढाईला बळ देणचे प्रेरणा देणे हे आपले सर्वांचे काम आहे.छञपती शिवाजी महाराजांवर प्रंचड निष्ठा असणारे डाॅ.अभिराज सुर्यवंशी यांना या कोरोना लढाईत नेवासा तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी हत्तीचे बळ कायम राहवे या सदिच्छा व प्रेम नेवासा तालुक्यातील जनतेच्या मिळत आहेत.

