shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना‌ चाचणीत १४० पैकी ०१ बाधित...!


नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील रुईछत्तीसी  या ठिकाणी आज पहिल्या डोसचे १२० जणांना लसीकरण करण्यात आले,कोरोनाची अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी करुन हे लसीकरण अतिशय नियोजनबद्ध पदध्तीने करण्यात आले.

१४० जणांची चाचणी करण्यात आली त्यापैकी १९ जण आसपासच्या गावातील होती त्यापैकी एक व्यक्ती कोरोना  बांधीत आढळून आला,रुईछत्तिशी गावातील १२१ पैकी ०१ व्यक्ती कोरोना बांधीत आढळून आला  यावरुन असे जाणवते की रुईछत्तिशी आणि परिसरातील सर्व ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव खूप कमी झालेला आढळून येतो,पॉझिटीव्ह व्यक्तिंना कोव्हीड सेंटरला दाखल करण्यात आले आहे,वेळोवेळी घेतलेल्या कोरोना चाचण्या आणि त्यातून शोधलेले पॉझिटिव्ह रुग्ण वेळीच बाहेर काढून उपचार केल्याने कोरोनाची परिस्थिती सध्या चांगली आटोक्यात आल्याचे जाणवते आहे,कोरोनाची साखळी जरी तुटत चालली असली तरी कोणीही आजार लपवून ठेऊ नये,काही त्रास होत असल्यास लगेच आपली चाचणी करुन घ्यावी असे आरोग्य अधिकारी सौ.सविता ससाणे यांनी सांगितले.


आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी आणि प्रशासन यांनी यावेळी सुसज्ज नियोजन करुन ही सर्व प्रक्रिया चांगल्या पद्धतीने हाताळून पारदर्शी कार्य केले याबद्दल पंचायत समिती सदस्य,माजी उपसभापती श्री.रविंद्र भापकर स्वतः उपस्थित  राहून विशेष सहकार्य केले,यावेळी वैद्यकीय अधिकारी सौ.सविता ससाणे,सरपंच विलास लोखंडे,माजी सरपंच व ग्रा.पं सदस्य ,श्रीकांत जगदाळे,माजी ग्रा.पं सदस्य भरत भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते संजय गोरे,ग्रा.पं सदस्य प्रवीण गोरे,निलेश गोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
close