shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाजसेवक मंगेश औताडे यांच्या वाढदिवसानिमीत्त 8 तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम संपन्न-



प्रतिनिधी । विशाल लोंढे :
कोपरगाव: आदिवासी-बहुजन ह्रदय सम्राट मंगेश औताडे हे वयाच्या 15 व्या वर्षापासुन सामाजिक काम करत संपुर्ण महाराष्ट्रभर आदिवासी- शिव-शाहु फुले-आंबेडकर यांचे विचार पेरत आहेत.

आज त्यांच्या सामाजिक कार्यामुळे युवकांचे ते प्रेरणास्थान तसेच गळ्यातील ताईत बनले आहेत!मधील काळात त्यांच्यावर खोटे नाटे आरोप प्रत्यारोप काही विरोधकांनी करत त्यांचा सामाजिक लढा थांबवण्याचे काम काही विरोधकांनी केल्याची चर्चा समाज माध्यात होती.


 परंतु एक युवा युवक सच्चा समाज रक्षक जनतेची निस्वार्थ सेवा करत आहेत ही गोष्ट जनतेच्या लक्षात येताच जनतेंनी मंगेश औताडे यांना खंबीर साथ दिली व विरोधकांना हार पत्करावा लागली  ही देखील चर्चा सामाजिक-राजकीय क्षेत्रात मध्यतंरी सुरू होती!योगा योग काल ह्या संघर्ष योध्याचा वाढदिवस येताच संपुर्ण महाष्ट्रातुन मित्रपरिवार राजकीय-शासकीय-सामाजिक  क्षेत्रातुन सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता!कोरोनाचा काळ असल्यामुळे गर्दी न करण्याचे आव्हान प्रदेश उपअध्यक्ष किरण गांगुर्डे यांनी केले होते.

या अनुषंगाने वाढदिवसानिमीत्त कोपरगाव तालुक्यात आनंद आहिरे,दादा मोरे,अमोल बर्डे,समीर माळी, एकलव्य आदिवासी परिषद पोहेगाव यांनी पोहेगाव येथे कोवीड सेेंटरला अर्थिक मदत केली व रक्तदान केले तसेच निफाड-लासलगाव येथे टायगर फोर्स तालुका अध्यक्ष शरद माळी व सहकारी यांच्या पुढाकारातुन मास्क-सॅनिटायझर-फळे वाटप करण्यात आले.

तर औरंगाबाद-पैठण येथे मुस्लिम संघटणेच्या वतीने आदिवासी मित्र  शफीक भैया शेख व सहकारी यांच्या पुढाकारातून मास्क सॅनिटायझर फळे वाटप करण्यात आले तर सिन्नर येथे तालुका प्रमुख सागर वाघ यांनी वृक्षरोपण करत मानव जातीला संदेश दिला की झाडे लावा आँक्सीजन वाचवा तसेच हिंगोली येथे आंबेडकर चळवळीतील प्रमुख अरविंद हनवते यांनी गरजुंना अन्नदान करत मानवतेचे दर्शन दिले असे अनेक तालुक्यात उपक्रम राबवत एकलव्य आदिवासी परिषदेच्या पदाधिकारी यांनी समाज सेवक मंगेश औताडे यांच्या वाढदिवसानिमीत्त मानव जातिला एक मदतीचा हात दिला आहेत.


याचे सर्वत्र कौतुक होत आहेतच पण हे समाज सेवक मंगेश औताडे परिस्थिने गरीब जरी असले तरी ते मनाने मोठे व जनसामान्यांना न्याय देणारे  असल्यामुळे गोर-गरीब व अल्पसंख्याक निराधार लोकांचे ते ताईतच बनले आहेत हीच चर्चा आता सर्व सामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात चर्चेच आहेत.
close