पिंपरी चिंचवड:-राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सिध्दार्थ बनसोडे असे आमदार पुत्राचे नाव आहे. त्याला पोलिसांनी रत्नागिरी येथुन अटक केली आहे. सिध्दार्थ बनसोडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. आमदार पुत्राला अटक करण्यात पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड पोलिसांनावर वारंवार होत होता. अखेर पोलिसांनी सिध्दार्थ बनसोडे याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
तानाजी पवार यांच्या सहकार्याला मारहाण आणि खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी सिध्दार्थ बनसोडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर 12 मे रोजी गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याप्रकरणी वेगळा गुन्हा दाखल असून त्यामध्ये तानाजी पवार आरोपी आहे. त्यानंतर सिध्दार्थ विरूध्द गुन्हे दाखल झाले. सिध्दार्थ बनसोडे हा रत्नागिरी जिल्हयातील पावस येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला पावसमधून अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त सो पिपरी चिंचवड,श्री कृष्ण प्रकाश,मा.अपर पोलीस आयुक्त
साो,पिंपरी चिंचवड श्री.रामनाथ पोकळे,मा.पोलीस उप-आयुक्त साो गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड श्री.सुधीर हिरेमठ
मा.पोलीस उप-आयुक्त सो,परि-१ श्री.मचंक इप्पर, मा.सहा पोलीस आयुक्त साो,पिंपरी विभाग डॉ.सागर कवडे यांचे मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.गणेश जवादवाड,पोलीस निरीक्षक गुन्हे श्री कृष्णदेव खराडे,पोलीस निरीक्षक डॉ.संजय तुगांर ,सपोनि श्री.लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रावसाहेब बांबळे पोलीस उपनिरीक्षक गवारे,सहा.पोलीस पो.फौज.घनवट,पो.हवा.सतिश ढोले,पो.हवा.विक्रम जगदाडे,पो.हवा कल्याण महानोर,पो.ना.कंठय्या स्वामी,राहुल मिसाळ,पो.शि.उमेश मोहिते,अमोल साळुखे,सोपान बोधवड सायबर शोखेचे अंमलदार पो.हवा नागेश माळी,पोशि विकास आवटे,लोखंडे, पोलीस उप-आयुक्त कार्यालय परि १ चे पो.हवा.राजु जाधव,पोहवा किशोर पंढेर,आनंद साळवी,पोना शंकर बांगर विनोद व्हनमाने,भुपेद्र चौधरी,विलास केकान,रमेश मावसकर,विजयबोडके,दिपक जाधवर पोशि तुषार गेंगजे यांनी केली आहे.
( मंचक इप्पर)पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१,पिंपरी चिंचवड.

