प्रतिनिधी । संतोष वायकर :
करमाळा : (दि .31) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झालीआहेत त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली व तालुका संघटन सरचिटणीस शशिकांत पवार तालुका सरचिटणीस महादेवजी फंड, अमरजीत साळुंखे, रेल्वे बोर्डाचे सल्लागार दीपक चव्हाण भाजपचे युवा नेते अमोल पवार युवा मोर्चा शहर सरचिटणीस मयुर देवी प्रमुख उपस्थितीत समर्पण दिन करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय कोव्हीड हॉस्पिटल सुरु झाले पासून आज पर्यंत आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा करणारे डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, यांना मास्क, सॅनिटायझर, वाटप करण्यात आले तसेच तिथे उपस्थित असलेल्या असलेल्या सर्व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांची आपुलकीने चौकशी करून सर्वांना धीर दिला..
याप्रसंगी भाजपा शहर सरचिटणीस लखमीचंद हसिजा नितीन आढाव गणेश वाशिंबे कर संतोष कांबळे तसेच सर्व कार्यकारणी सदस्य व भाजपा पदाधिकारी व रुग्णालयात सेवा देणारे सर्व डॉक्टर नर्सेस सफाई कामगार व सर्व स्टाफ उपस्थित होते .

